शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

आष्टीत बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: June 26, 2017 00:36 IST

आष्टी : तालुक्यातील खडकत येथील सेन्ट्रल बँक आॅफ इंडिया या शाखेमधील तिजोरीच्या खोलीमधील सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यातील खडकत येथील सेन्ट्रल बँक आॅफ इंडिया या शाखेमधील तिजोरीच्या खोलीमधील सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. हा चोरीचा प्रयत्न फसल्याने बँकेतील लाखो रूपये सुरक्षित राहिले आहेत. आष्टी पोलिसांत तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.खडकत येथील जामखेड ते माहिजळगाव या रस्त्यावर सेन्ट्रल बँक आॅफ इंडियाची शाखा गावाच्या बाहेरील बाजूस आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता शाखेतील व्यवहार संपल्यानंतर शाखा बंद करण्यात आली. मध्यरात्रीनंतर पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान विनानंबरच्या जीपमधून आलेल्या चोरट्यांनी प्रथम बँकेच्या शटर चॅनल गेटचे कुलूप व सायरनचे कनेक्शन तोडून आत प्रवेश केला. तसेच कॅशिअर काऊंटरचे आणि व्यवस्थापकाच्या काऊंटर ड्रॉवरचे कुलूप तोडून उचकापाचक केली. त्यानंतर त्यांनी तिजोरीकडे आपला मोर्चा वळविला. दरवाजा उघडताच तेथील सायरन वाजला आणि चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. पहाटेच्या सहरच्या नमाजसाठी उठलेल्या मुस्लीम बांधवांना सायरनचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी बँकेच्या दिशेने धाव घेतली असता हा प्रकार दिसून आला. बँकेमध्ये खाजगी मजुरीने असलेले बबन जेवे यांनी हा प्रकार मुख्य रोखपाल गणेश शिंदे यांना दूरध्वनीवरून कळवला. तोपर्यंत आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी तिजोरीतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे समजले. शाखा व्यवस्थापक, मुख्य रोखपाल गणेश शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश गोडसे यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ३.२६ वा. २५ ते ३० वयोगटातील तीन चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्याचे दिसून आले. ३.३२ वाजता सायरन वाजल्याने चोरटे पळाल्याचे समोर आले.