शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएसचे वरिष्ठ शहरात

By admin | Updated: July 26, 2016 00:12 IST

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी परभणी येथून अटक करण्यात आलेल्या इसिस समर्थक अतिरेक्याकडून स्फोटकाचा साठा जप्त करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी परभणी येथून अटक करण्यात आलेल्या इसिस समर्थक अतिरेक्याकडून स्फोटकाचा साठा जप्त करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मराठवाड्यातून इसिसशी संबंधित अटक करण्यात आलेला हा दुसरा संशयित अतिरेकी आहे. याबाबतची माहिती मिळताच महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील खोले यांच्यासह अन्य अधिकारी सोमवारी दिवसभर औरंगाबादेत तळ ठोकून आहेत याविषयी एटीएसच्या खास सूत्राने सांगितले की, परभणी येथील नासेरबीन अबुबकर याफई (चाऊस)यास १३ जुलै रोजी एटीएसने उचलले. पोलीस चौकशीत त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने बॉम्ब तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी पुन्हा परभणीतून नासेरबीनचा साथीदार शाहिद खान यास उचलले. त्याच्याकडून आयईडी या अत्यंत घातक स्फोटकाचा साठा आणि डिटोनेटर्स जप्त केले. दोन्ही आरोपी हे सिरियातील इसिस या दहशतवादी संघटनेच्या फारूखसोबत इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होते. मराठवाड्यातील सुमारे शंभर तरुण इसिसच्या संपर्कात असल्याचे आणि हे तरुण एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी प्रसारमाध्यमाला सांगितले आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक तरुण इसिसच्या संपर्कात असल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर या तरुणांना शोधून काढण्यासाठी एटीएसने आता तयारी सुरू केली आहे. पुढील व्यूहरचना निश्चित करण्यासाठी एटीएसचे वरिष्ठ अधिकारी सुनील खोले यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी औरंगाबादेतील कार्यालयात सोमवारी तळ ठोकून होते.