शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषी अजूनही मंगळाच्या फेऱ्यात

By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : ज्योतिषी अजूनही मंगळ-मंगळी पत्रिकेच्या परीक्षेतच गुंतलेले आहेत.

औरंगाबाद : विज्ञानाने मंगळ यान गाठून झेंडा रोवला. ज्योतिषी अजूनही मंगळ-मंगळी पत्रिकेच्या परीक्षेतच गुंतलेले आहेत. ही परीक्षा घेण्याऐवजी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मार्गदर्शन २१ व्या शतकामध्ये ज्योतिषी व शास्त्राकडून झाले पाहिजे, असे मत बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.१० लेखकांच्या पुस्तकांमधील १० प्रकरणे चोरून लिहून पुस्तके लिहिणारे दुसऱ्यांचे भविष्य काय सांगणार. कालसर्प, षडाष्टक योगाची भीती घालण्यापेक्षा सकारात्मक मार्गदर्शक करणे महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांची नावेदेखील ज्योतिषांना माहिती नसतात. अशा मंडळींच्या हाती लोकांचे भविष्य कसे असू शकेल, असा सवालही त्यांनी केला. ज्योतिषशास्त्र ७० टक्के विवाह जुळविण्यासाठीच वापरले जात आहे. या पलीकडेही अभ्यासाच्या मर्यादा वाढविल्या पाहिजेत. २१ व्या शतकात हे शास्त्र म्हणून पुढे येण्यासाठी उपासना करावी लागेल. ज्योतिषांना रंजकतेने भविष्य सांगता आले पाहिजे, तरच शास्त्राचा सकारात्मक प्रचार होईल. या शास्त्राचे मूळ कायम ठेवून रचना बदलावी लागेल. किती दिवस जुन्या कल्पनेत अडकणार, शास्त्राच्या नियमांत बदल करणे गरजेचे आहे. २०० हून अधिक शिक्षणाची दालने, १०७ नोकरी व्यवसायांचे मार्ग आहेत. तरीही भविष्य सांगणारे, पाहणारे इंजिनिअर, डॉक्टर या शिक्षणयोगावरच भर देतात. नवग्रह, देवदैवतांची पूजा करायची की शांती करायची हा स्वत:ला प्रश्न पडला पाहिजे. बहुजन समाज आजही पत्रिका दाखविण्यासाठी ब्राह्मणाकडे गेल्याचे सांगतो, ज्योतिषाकडे गेल्याचे सांगत नाही. हे शास्त्र सर्वव्यापी झाले पाहिजे, विद्यापीठात हे शास्त्र जोवर जात नाही, तोवर विकास होणार नाही.