शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘साई’ केंद्रातील अ‍ॅस्ट्रो टर्फचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:03 IST

विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात मराठवाड्यातील पहिले आॅलिम्पिक शैलीचे अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. या मैदानावर अ‍ॅस्ट्रो टर्फच्या सर्वच स्ट्रीप्स लावण्यात आल्या आहेत. यासाठी पेव्हरब्लॉक, लाईट आदी आवश्यक सुविधांचे थोडेच काम बाकी राहिले आहे. हे काम लवकरच पूर्णत्वास येणार असल्यामुळे मराठवाड्यातील प्रतिभावान खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठरू शकणाºया अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर खेळण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे.

ठळक मुद्देप्रतीक्षा उद्घाटनाची : मराठवाड्यातील खेळाडूंना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकी मैदानावर खेळण्याची संधी

औरंगाबाद : विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात मराठवाड्यातील पहिले आॅलिम्पिक शैलीचे अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. या मैदानावर अ‍ॅस्ट्रो टर्फच्या सर्वच स्ट्रीप्स लावण्यात आल्या आहेत. यासाठी पेव्हरब्लॉक, लाईट आदी आवश्यक सुविधांचे थोडेच काम बाकी राहिले आहे. हे काम लवकरच पूर्णत्वास येणार असल्यामुळे मराठवाड्यातील प्रतिभावान खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठरू शकणाºया अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर खेळण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे.तब्बल ६ कोटी रुपये खर्च लागलेल्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील रिओ आॅलिम्पिकच्या धर्तीवर असणारे निळ्या रंगाचे अ‍ॅस्टर्फ हॉकी मैदानाचे १४ जून २०१६ रोजी भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सर्वात प्रथम हे मैदान लेव्हलिंग करण्यात आले. त्यानंतर माती, दगडाचे छोट-छोटे तुकडे, डांबर, रबर शॉकपॅड आदींचे थर मैदानावर लावण्यात आले होते. टर्फ लावण्याआधी ग्लू केमिकलचा स्प्रे मारून टर्फ चिकटवण्यात आले होते. या कामासाठी आॅस्ट्रेलियातून दोन जणांचे पथक आले होते. त्याचप्रमाणे मैदानाभोवती फेन्सिंग करण्यात आले आहे. तसेच एक लाख लिटर पाण्याची क्षमता असणारे वॉटर टँक उभारण्यात आले असून, तेथून पाईपलाईनद्वारे अ‍ॅस्ट्रो टर्फवर स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जाणार आहे. या टर्फ मैदानावर एकूण सहा स्प्रिंकर्ल्स असणार आहेत. स्प्रिंकलरद्वारे अ‍ॅस्ट्रो टर्फवर पाणी फवारल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत त्यावर खेळता येणार आहे. तथापि, येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धा पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी औरंगाबादकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या तरी या मैदानावर प्रेक्षागृह उभारण्यात आलेले नाही. तेही आगामी काळात होईल, असा विश्वास ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी व्यक्त केला आहे.फेब्रुवारी महिन्यातच उद्घाटनअ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे पेव्हर ब्लॉकचे काम बाकी आहे. ते आगामी काही दिवसांतच पूर्ण होईल. तसेच मैदानाभोवती असणाºया वॉल पेंटिंगचेही काम सुरू आहे. पॅव्हेलियनही उभारावयाचे आहे. १५ फेब्रुवारीनंतरच या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे उद्घाटन होईल. यासाठी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोडसह अनेक दिग्गजांना आणण्याचा प्रयत्न असणार आहे, असे साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.