शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहायक फौजदारांचे स्टार अडकले लाल फितीत

By admin | Updated: July 14, 2015 00:30 IST

औरंगाबाद : सहा महिन्यांपूर्वी विविध ठाण्यांत फौजदार म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना एक महिन्यापूर्वी अचानक पदावनत करीत त्यांचे एक स्टार काढून घेत

औरंगाबाद : सहा महिन्यांपूर्वी विविध ठाण्यांत फौजदार म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना एक महिन्यापूर्वी अचानक पदावनत करीत त्यांचे एक स्टार काढून घेत त्यांना सहायक फौजदार करण्यात आले आहे. पदावनत करण्यात आलेल्या सहायक फौजदारांची बढती गृह विभागाच्या लाल फितीत अडकल्याचे समोर आले आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी खात्यांतर्गत फौजदाराची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३५ सहायक फौजदारांना फौजदारपदी नेमणूक दिली. गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यात या फौजदारांची नेमणूक करण्यात आली. या अधिकाऱ्यांची सहा महिन्यांसाठी नेमणूक राहील असे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. हा कालावधी संपल्यानंतर एक दिवसाचा खंड देऊन पुन्हा नेमणूक देण्यात येईल, असेही तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले होते. दरम्यान १५ जून रोजी पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या ३५ फौजदारांना अचानक पदावनत करून त्यांच्या खांद्यावरील एक स्टार काढून घेण्यात आला. तेव्हापासून हे अधिकारी सहायक फौजदार बनले आहेत. या अधिकाऱ्यांना सहा महिन्यानंतर एक दिवस खंड देऊन पुन्हा फौजदारपदी नेमणूक करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र एक महिन्यानंतरही या अधिकाऱ्यांच्या बढतीचा विचार झाला नाही. तांत्रिक कारणावरून पदावनत करण्यात आलेले असले तरी ही बाब सर्वसामान्य लोक आणि गुन्हेगार यांना माहीत नसते. शिक्षा म्हणून त्यांना पदावनत करण्यात आले असावे, असा समज लोकांमध्ये निर्माण होतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. याविषयी पोलीस उपायुक्त संदीप आटोळे म्हणाले की, खात्यांतर्गत फौजदारपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३५ फौजदारांना पदावनत करण्यात आल्याने आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होतो. त्यामुळे त्यांना पुन्हा फौजदारपदी नेमणूक देण्यात येणार आहे. मात्र याबाबत शासन धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे कळते. यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे.