शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चितेवर जिवंत समर्पणाची मागितली मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:38 IST

तालुक्यातील वासनवाडी येथे कुस्तीच्या फडात बाळू नामदेव पट्टेकर या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर फिर्यादीस आरोपींकडून मारहाणीच्या धमक्या येऊ लागल्या. पोलिसांनी संरक्षण द्यावे तसेच आरोपींना अटक करावे अन्यथा चितेवर जिवंत समर्पणाची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री यांना फिर्यादी धनराज दळवी यांनी पाठविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील वासनवाडी येथे कुस्तीच्या फडात बाळू नामदेव पट्टेकर या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर फिर्यादीस आरोपींकडून मारहाणीच्या धमक्या येऊ लागल्या. पोलिसांनी संरक्षण द्यावे तसेच आरोपींना अटक करावे अन्यथा चितेवर जिवंत समर्पणाची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री यांना फिर्यादी धनराज दळवी यांनी पाठविले आहे.२२ आॅगस्ट रोजी वासनवाडी येथे गवळीबाबा देवस्थान यात्रेत कुस्ती पाहण्यासाठी धनराज दळवी व बाळू पट्टेकर गेले होते. याचवेळी ‘तू आमच्यासमोर का उभा ठाकलास’? असे म्हणत मुन्ना घोलप, विजय जाधव, कृष्णा घोलप, संजय खोड, कृष्णा खोड यांच्यासह इतर लोकांनी बाळूला मारहाण केली, यामध्ये गंभीर जखमी होऊन बाळूचा मृत्यू झाला. बीड ग्रामीण ठाण्यात धनराज दळवी यांनी फिर्याद दिली. त्यानंतर दळवीसह त्यांच्या कुटुंबियांना आरोपींकडून फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव येऊ लागला. तसेच धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे दळवी यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. पोलिसांनी अद्यापपर्यंत अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला नसल्याचेही दळवी यांनी पत्रात नमूद केलेआहे.