शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एशियाड बसने पर्यटक झाले अजिंठ्यास रवाना

By admin | Updated: November 3, 2016 01:32 IST

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीसाठी देण्यात आलेल्या पर्यटन बसेसची पळवापळवी सुरूच आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने जादा बस

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीसाठी देण्यात आलेल्या पर्यटन बसेसची पळवापळवी सुरूच आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने जादा बस म्हणून अजिंठ्याची वातानुकूलित पर्यटन बस पुण्याला पाठविण्यात आली. तर पर्यटकांना चक्क एशियाड बसने अजिंठ्याला रवाना करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला. औरंगाबाद शहरातून गेली अनेक वर्षे पर्यटकांना वेरूळ, अजिंठा लेणी येथे जाण्यासाठी एस. टी. महामंडळाची साधी बस किंवा खाजगी वाहतूक साधनांचा आधार घ्यावा लागत होता. विदेशी पर्यटकांसह मोठ्या शहरातून येणाऱ्या पर्यटकांना अनेकदा ‘एसटी’ने प्रवास करणे गैरसोयीचे वाटते. शहरात येणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला. जिल्हा नियोजन समितीने पर्यटन विकासासाठी दोन वातानुकूलित बस खरेदी करण्यासाठी १.८० कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून खरेदी करण्यात आलेल्या दोन पर्यटन बस १५ आॅक्टोबर २०१५ पासून वेरूळ आणि अजिंठ्यास जाणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्या. प्रारंभी या बसेसच्या प्रचाराअभावी पर्यटकांचा प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे पर्यटक नसल्याचे कारण पुढे करून या बसेस थेट पुण्याला सोडण्याचा प्रकार सुरू झाला. हा प्रकार काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे.नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त शहरातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सुटीच्या कालावधीत पुणे मार्गावरील ‘एसटी’ची शिवनेरीसह प्रत्येक बस प्रवाशांनी भरून जाते. दिवाळीच्या सुट्यानंतर परतीच्या प्रवासानिमित्त हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सध्या अजिंठा, वेरूळ लेणीला भेट देणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. असे असताना पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी पर्यटन बस रवाना करण्यात आली. परंतु ही बस वेळेवर परत आली नाही. त्यामुळे बुधवारी ऐनवेळी एशियाड बसमधून अजिंठ्याला जाण्याची वेळ पर्यटकांवर आली. पर्यटन बस ज्या उद्देशासाठी देण्यात आली आहे, त्या उद्देशाला वेळोवेळी पायदळी तुडविले जात आहे. शिवाय लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे ही बस लवकर भंगार होण्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे हा प्रकार थांबविण्याची मागणी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.