औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटीचा करार रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कंपनी बंद होणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. ज्या वसाहतींना पाणी देण्यात येत आहे, तेथील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. कंपनीच्या कारभाराला आता मनपाचे अधिकारीही जाम वैतागले आहेत.मनपाने ४ जुलै रोजी कंपनीला करार रद्द का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे. नोटीसचे उत्तर एक महिन्यात द्यावे, असेही मनपाने म्हटले होते. ३ आॅगस्ट रोजी नोटीसची मुदत संपत आहे. कंपनीने मनपाच्या नोटीसचे उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच मनपाला उत्तरही प्राप्त होणार आहे. शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा मनपातर्फे चालविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीही केली आहे. ऐन पावसाळ्यात शहरातील काही वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागतो. औरंगाबाद वॉटर युटिलिटीमधील अनेक अधिकारी व कर्मचारी नोकरी सोडून निघून गेले आहेत. जे कर्मचारी कार्यरत आहेत, ते मोबाईल बंद ठेवत आहेत.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या अनेक तक्रारी मनपाकडे येत आहेत. मनपा अधिकाऱ्यांना पाण्याच्या टाकीवर किंवा घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करावा लागतो.
शहरात कृत्रिम पाणीटंचाई...
By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST