शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर लंपास करणाऱ्या दरोडेखोरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:05 IST

पैठण : साखर कारखान्यास ट्रॅक्टरने ऊस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यास मारहाण करून किमती ऐवज व ट्रॅक्टर लंपास करणाऱ्या दरोडेखोरास पैठण ...

पैठण : साखर कारखान्यास ट्रॅक्टरने ऊस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यास मारहाण करून किमती ऐवज व ट्रॅक्टर लंपास करणाऱ्या दरोडेखोरास पैठण पोलिसांनी सोमवारी अटक केली व त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली, तर काही दिवसांपूर्वी ट्रॅक्टर पोलिसांनी हस्तगत केले होते. आरोपीने तालुक्यातील अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले. कृष्णा धोंडीराम गोर्डे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील बाळासाहेब जगन्नाथ ढेंबरे हे २० जानेवारी रोजी ऊस घेऊन जात होते. तेव्हा रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चार जणांनी पैठण शिवारात त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाइल, रोख रक्कम व ट्रॅक्टर हिसकावून धूम ठोकली. याबाबत ढेंबरे यांनी पैठण ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांकडून तपास चक्रे फिरविली गेली. तेव्हा फरार आरोपी कृष्णा धोंडीराम गोर्डे हा औरंगाबाद शहरातील किलेआर्क भागात राहत असल्याची माहिती मिळाली. पैठण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तर आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र. एमएच २० एफटी १२७८) जप्त केली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि गजानन जाधव, पोउपनि सी.जी. गिरासे, रामकृष्ण सागडे, पोलीस नाईक गोपाल पाटील यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी.जी. गिरासे करीत आहेत.

यापूर्वी चोरले होते आठ विद्युतपंप

आरोपी कृष्णा गोर्डे याने यापूर्वी एमआयडीसी पैठण पोलीस ठाणा हद्दीतील शेतकऱ्यांच्या विहिरीतून आठ विद्युतपंप त्याच्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर याच गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर (क्र. एमएच २३ एएस २८८२) यापूर्वी अटक केलेला आरोपी नितीन घटे याच्या कडून जप्त करण्यात आले आहे.

फोटो : आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पल्सर मोटारसायकलसह पोलीस निरीक्षक किशोर पवार, साहेबराव गिरासे, गोपाळ नाईक व ताराचंद गव्हाणे आदी.

120421\1618238159108_1.jpg

पैठण