त्यांनी सांगितले की, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यापूर्वी संबंधितांनी देव-धर्माविषयी जाणून घेतले पाहिजे. साहित्य वाचले पाहिजे. आई-वडिलांनीसुद्धा तसे संस्कार केले पाहिजेत.
धर्माचा उपमर्द करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल अर्थ मुनीष देवपुरी, रितेश जाधव, अंकित छकडी आणि आदित्य पवार या चौघांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणावरून भाजपमध्ये अंतर्गत राजकारण सुरू झाले आहे. या प्रकरणातील आरोपी चारही मुले बड्या घरची असल्याने भाजपच्या दोन लोकप्रतिनिधींनी आणि काही उद्योजकांनी हे प्रकरण मिटावे यासाठी प्रयत्न केले, तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या एका माजी मंत्र्याने या प्रकरणात पोलीस यंत्रणेला फोन करून तपास करण्याची मागणी केली. आता चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतली आहे. हिंदू धर्माचा अपमान करणारे कुणीही असो, त्यांना अटक झाली पाहिजे, असे खैरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणावरून भाजपविरुद्ध शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.