औरंगाबाद : राज्यातील ‘ड’ वर्ग मनपांसाठी तयार केलेली नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) औरंगाबाद मनपाला लागू करण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. औरंगाबाद मनपा ‘क’ वर्गात आहे. त्यामुळे तिला ‘ड’ वर्गाची नियमावली लागू करणे चुकीचे असल्याचे सेनेचे म्हणणे आहे. तब्बल आठ मुद्यांच्या आधारे हा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिकांसाठी एकच विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) तयार करण्यासाठी राज्य सरकारने २०१२ साली एका समितीची स्थापना केली होती. तिने तयार केलेल्या नियमावलीचा मसुदा सरकारने महिनाभरापूर्वीच प्रसिद्ध केला. त्यात ही नियमावली औरंगाबाद मनपालाही लागू राहील, असे म्हटले आहे. डीसी रुल्स तयार करण्यासाठी समिती नियुक्त केली. त्याऐवजी औरंगाबाद मनपा ‘ड’ वर्गात होती. परंतु वर्षभरापूर्वीच ती ‘क’ वर्गात गेली. त्यामुळे आता ही नियमावली लागू करण्यास शिवसेनेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. पक्षाचे मनपातील गटनेते रेणुकादास वैद्य यांनी नगररचना खात्याच्या सहसंचालक कार्यालयाकडे हा आक्षेप नोंदविला आहे. राज्य सरकारने मनपाच्या विनंतीवरून ‘ड’ वर्ग मनपाच्या नियमावलीत औरंगाबादचा समावेश करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.
नियमावलीवर सेनेचा आक्षेप
By admin | Updated: December 20, 2015 00:10 IST