शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सेनेतील पदाधिकारीही पक्षांतराच्या वाटेवर !

By admin | Updated: January 6, 2017 00:25 IST

कळंब : शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

कळंब : शहराच्या राजकारणातील पक्षांतर करण्याच्या घटनेचा पहिला अंक बुधवारी संपला असताना आता आगामी काही दिवसात आणखी एक पक्षांतराचा दुसरा अंक रंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.कळंब शहरातील काँग्रेसचे नगरसेवक व इतर काही पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. न. प. निवडणुकीनंतर काँग्रेसच्या या मंडळींनी सेनेत जायचा निर्णय घेतला असे सांगितले जात असले तरी न.प. निवडणुकीच्या आधीच हे सर्व राजकारण शिजले होते. असा दावा आता सेनेतून काही कार्यकर्ते करु लागले आहेत. न.प. निवडणुकीत सेनेच्या शहरातील काही कार्यकर्त्यांनी काँगे्रसचा आतून प्रचार केला होता. काँगे्रसच्या एका नगरसेवकाला निवडून आणण्यासाठी सेनेच्या एका उमेदवाराला त्या प्रभागातही फिरकु दिले नव्हते. सोबतच्या उमेदवारालाही दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छायाताई कुंभार व प्रभाग क्रं. १ मधील उमेदवार पांडूरंग कुंभार यांना पराभूत करण्यासाठी सेनेतील एका नेत्याने काँग्रेसला मदत केल्याचा थेट आरोप काही नाराज शिवसैनिकांतून केला जातो आहे. याच नेत्याने निवडणुकीनंतर काँग्रेसच्या या गटाला सेनेमध्ये घेण्यासाठी पुढाकार घेवून या पाडापाडीच्या राजकारणात समाविष्ट असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केल्याचेही या शिवसैनिकांचे म्हणणे आहे.काँग्रेसमधून फुटून सेनेमध्ये आलेल्या या गटाच्या पक्ष प्रवेशावेळी मुंबई येथे शहरातील काही मंडळी आवर्जूून उपस्थित होती. त्यावरुन हा सर्व कारभार न.प. निवडणुकीपूर्वीच करण्यात आला होता असा दावाही हे कार्यकर्ते करीत आहेत. कुंभार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले होते. परंतु स्वत:च्या राजकारणासाठी पक्षाची प्रतिष्ठा घालविणाऱ्या या घरभेद्यांना पक्षाने अभय दिल्यास चुकीचा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल, अशी चिंताही या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. एकूणच सेनेतील कुंभार यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. कुंभार यांनी आधीच पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने ते कोणत्या पक्षात जातात याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेस, भाजप किंवा राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यास या पक्षांना आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे या तीनही पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कुंभार यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतला नसला तरी त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.(वार्ताहर)