शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

सेनेचे ‘बी’ फॉर्म तयार!

By admin | Updated: September 25, 2014 00:56 IST

विकास राऊत, औरंगाबाद शिवसेना-भाजपा युतीचे गणित किती जागांवर सुटणार यावरून अजून वरिष्ठ पातळीवर खल सुरू असला तरी शिवसेनेने मात्र, जिल्ह्यातील सर्व जागांसाठी ‘बी’ फॉर्म तयार ठेवले आहेत.

विकास राऊत, औरंगाबादशिवसेना-भाजपा युतीचे गणित किती जागांवर सुटणार यावरून अजून वरिष्ठ पातळीवर खल सुरू असला तरी शिवसेनेने मात्र, जिल्ह्यातील सर्व जागांसाठी ‘बी’ फॉर्म तयार ठेवले आहेत. २५ रोजी सकाळी ९ वा. ‘बी’ फॉर्म वाटप होणार आहेत. सेनेच्या वाट्याला आलेल्या ६ पैकी ५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश आले आहेत. युती झाल्यास पाच उमेदवार अर्ज दाखल करतील. युती तुटल्यास सेनेने पूर्ण ९ जागांसाठी तयारी ठेवली आहे. शहरातील पश्चिम आणि मध्य मतदारसंघातील जागांबाबत काही वाद नसल्यामुळे तेथील अर्ज २५ रोजी दाखल करण्यात येणार आहेत. उर्वरित चार जागांपैकी गंगापूर मतदारसंघाची अडचण असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. शहरातील मध्य, पश्चिम, वैजापूर, कन्नड, पैठण येथील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले आहे. उद्या २५ किंवा २६ रोजी उर्वरित उमेदवार अर्ज भरतील. आजवर मुखपत्रातून यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उमेदवार अर्ज दाखल करायचे. मात्र यावेळी त्या परंपरेला छेद देण्यात आला आहे. बंडखोरी होऊ नये, यासाठी ही सगळी उठाठेव करण्यात आल्याचे बोलले जात आहे.वैजापूरमधून आ. आर. एम. वाणी, पैठणमधून माजी आ.संदीपान भुमरे, कन्नडमधून आ. हर्षवर्धन जाधव, मध्य मतदारसंघातून आ.प्रदीप जैस्वाल तर पश्चिम मतदारसंघातून आ.संजय शिरसाट यांची नावे सध्या आहेत. या उमेदवारांची नावे निश्चित झाली अशी माहिती सेनेच्या गोटातून देण्यात आली आहे.आ.जैस्वाल आणि आ.शिरसाट यांनी तर २५ रोजी उमेदवारी दाखल करणार असल्याचे जाहीर करून टाकले. आ.शिरसाट म्हणाले, आपल्यासमोर कुणाचेही आव्हान नाही. तर आ.जैस्वाल यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशाने अर्ज दाखल करणार असल्याचे कळविले आहे.