शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एकमेकांची कोंडी करत सेना-भाजपाची स्वतंत्र चूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 00:26 IST

बीड जिल्ह्यातील सहाही पालिकांमध्ये युती करून निवडणुकीची समीकरणे बदलण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना आणि भाजपाने युती ऐवजी एकमेकांची कोंडी करण्याचेच राजकारण केले

प्रताप नलावडे  बीडजिल्ह्यातील सहाही पालिकांमध्ये युती करून निवडणुकीची समीकरणे बदलण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना आणि भाजपाने युती ऐवजी एकमेकांची कोंडी करण्याचेच राजकारण केले. त्यामुळे आता परळी वगळता इतर ठिकाणी युतीचे मनसुबे ठेवणारेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होईल आणि ते विरोधकांसमोर आव्हान ठेवतील, अशी चर्चा अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रंगत होती. परंतु कोणती पालिका कोणाकडे या मुद्यावरची चर्चा शेवटपर्यंत संपलीच नाही. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे हे दोघे युतीच्या संदर्भात चर्चा करत होते. आता त्यांनीच एकमेकांवर आरोप करण्यास सुरूवात केली आहे. सेनेचे जिल्हाध्यक्ष जगताप यांनी तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपाचा उमेदवार बीडमध्ये नगराध्यक्षपदासाठी देऊ नये, अशी सूचना करूनही पोकळे यांनी केवळ कोंडी करण्यासाठी भाजपाचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. युती फिसकटल्यामुळे मतविभाजनाचा धोका दोघांनाही होण्याची शक्यता आहे. बीडमध्ये शिवसेनेने सुदर्शन धांडे यांना उमेदवारी दिली असून भाजपाचे सलीम जहाँगीर रिंगणात आहेत.त्यामुळे शिवसेना आणि भाजपाने बीडसह धारूर, माजलगाव, गेवराई या ठिकाणी स्वतंत्र चूल मांडली आहे. परळीत भाजपा आणि शिवसेना एकत्र लढत असून सोबत रिपाइंही आहे भाजपाचे २३ उमेदवार तर सेनेचे सात उमेदवार आणि रिपाइंचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धारूर आणि माजलगावमध्ये सेना आणि भाजपा यांची युती होण्याची शक्यता सुरूवातीला व्यक्त होत होती. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना झुलवत ठेवत अखेरच्या क्षणी दोघांनीही आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेत एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. माजलगाव आणि धारूर या दोन ठिकाणी जनविकास आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीसोबत भाजपा माजलगावात तर शिवसेना धारूरमध्ये असून आपले उमेदवार आघाडीच्या माध्यमातून दिले आहेत. माजलगावमध्ये शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी नितीन मुंदडा यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने आघाडीचे उमेदवार सहाल चाऊस यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. धारूरात सेना आघाडीसोबत असून नगराध्यक्षपदासाठी अमर महामुनी रिंगणात आहेत. भाजपाने याठिकाणी डॉ. स्वरूपसिंह हजारी यांना उमेदवारी देऊन स्वतंत्र उमेदवार दिला आहे.