शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र चोरट्यांचा परंड्यात धुमाकूळ

By admin | Updated: January 1, 2015 00:25 IST

उस्मानाबाद : धारधार शस्त्रास्त्राचा धाक दाखवून शहरातील पाच घरे फोडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरातील

उस्मानाबाद : धारधार शस्त्रास्त्राचा धाक दाखवून शहरातील पाच घरे फोडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरातील संगम पार्क व कासीमबाग परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी हा धुमाकूळ घातला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहराच्या बाहेरील बाजूस संगम पार्क ही वसाहत आहे. तर करमाळा रोडवर कासीम बाग असून, या दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी हा धुडघूस घातला. संगम पार्क कॉलनीतील परवेज सैफन शेख यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरात उपस्थित असलेल्यांना शस्त्रास्त्राचा धाक दाखवित ४ हजार रुपये रोख व २२ हजाराचे सोन्याचे दागदागीने लुटले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेजारीच राहत असलेल्या फकीर दादा बनसोडे यांच्या घराकडे वळविला. त्यांच्याकडील २ हजार ४०० रुपये व सोन्याचे दागीने धमकावून घेतल्यानंतर मैनू लतीफ शेख यांचा दहा हजाराचा मोबाईल घेवून चोरटे निजाम हाफीसाब यांच्या घराकडे वळले. त्यांच्या घरातून रोख २५० रुपये घेवून चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. एवढ्यावरच न थांबता याच परिसरातील इतर घरांच्या खिडक्या व दारे उचकटण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांकडे धारधार शस्त्रे असल्याने त्यांचा प्रतिकार करण्यात अपयश आल्याचे नागरिकांनी सांगितले. संगम पार्कबरोबरच कासीमबाग परिसरालगत असलेल्या काही घरात घुसूनही चोरट्यांनी शस्त्रास्त्राचा धाक दाखवून लुट केल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील काही नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांवर दगडफेक करीत चोरटे पसार झाले. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करावा. तसेच चोरट्यांवर लगाम घालण्यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.(प्रतिनिधी)