शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाचा सर्पमित्रांना अखेर चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 01:05 IST

औरंगाबाद : वन विभागाने औरंगाबाद, जालना येथील ४० पैकी २० सर्पमित्रांचे परवाने रद्द करून सर्पमित्रांना चाप बसविला आहे. नावनोंदणी, नूतनीकरण नाही,

औरंगाबाद : वन विभागाने औरंगाबाद, जालना येथील ४० पैकी २० सर्पमित्रांचे परवाने रद्द करून सर्पमित्रांना चाप बसविला आहे. नावनोंदणी, नूतनीकरण नाही, वार्षिक कामगिरीचा काहीही रिपोर्ट नसल्याने नियमांवर बोट ठेवून वन विभागाने कारवाई केली आहे.साप दिसला की, वन विभाग किंवा मित्रांना किंवा फायर ब्रिगेडलादेखील कॉल केले जातात. तुम्ही ज्या क्षेत्रात राहता त्या क्षेत्रात सर्पमित्र तात्काळ उपलब्ध होत नाही. सर्प मानवाचा शत्रू नसून तो मित्र आहे, ही शिकवण आठवते. सापाला मारून त्याच्या प्रजाती नष्ट करणे योग्य नाही, असे सांगून सर्पमित्रांची वाट पाहिली जाते. सर्प अन्न शोधार्थ एखाद्या घरात शिरलेला असतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यास सर्पमित्रांकरवी धरून सुरक्षित वन विभागात सोडण्यात यावे, हीच खरी प्रक्रिया आहे.सर्पमित्रांची संख्या वन विभागाकडे जवळपास ४० नोंदलेली होती. यातील १४ सर्पमित्रांनी उपवनसंरक्षकांकडे नूतनीकरण केले. इतरांना वन विभागाने नोटिसा पाठवून विचारणा केली. परंतु त्यावर काहीही उत्तर आले नाही. फक्त ४ जणांनी उत्तरे दिली अन् नूतनीकरण केले. यंदा २ नवीन परवाने देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी आपल्या परवान्याचे नूतनीकरण करावे हे सक्तीचे आहे. मात्र, त्याकडे चुकूनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचे उपवनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुंजे म्हणाले.