शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निकष पायदळी तुडवत स्वीकृत सदस्यांच्या निवडी !

By admin | Updated: May 24, 2017 00:32 IST

लातूर : एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल, तर ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्य पदासाठी पात्र असते.

हणमंत गायकवाड । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल, तर ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्य पदासाठी पात्र असते. शिवाय, साहित्य, कला, क्रीडा, वैद्यकीय व्यवसाय, विधिज्ञ, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांत निपूण व्यक्तींना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य करावेत, असे निकष आहेत. मात्र या निकषांना पायदळी तुडवत केवळ कागदोपत्री मेळ घालून जातीय समीकरणांचाच विचार करून भाजप व काँग्रेसने स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. स्वीकृत सदस्य निवडीबाबतचा २८ फेब्रुवारी २०१२ चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयानुसार वैद्यकीय, शिक्षण, सनदी लेखापाल, नगर परिषदेत मुख्याधिकारी किंवा महापालिकेत सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेल्या, सामाजिक कार्यात निपूण असलेल्या व्यक्ती स्वीकृत सदस्यासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. सोमवारी लातूर महापालिकेतील पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडी झाल्या. भाजपाकडून तीन आणि काँग्रेस पक्षाकडून दोन अशा पाच जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. त्यात एक-दोन जणांचा अपवाद वगळता शासन निकषात कोणी बसत असेल असे वाटत नाही. या निवडीबाबत विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, साहित्य क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा केली असता स्वीकृत सदस्य निवडीचे संकेत पाळले जात नसल्याची खंत व्यक्त झाली. थेट निवडणुकीतून अशा तज्ज्ञ व्यक्ती मनपात सदस्य म्हणून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीची सोय आहे. गतवेळी काही प्रमाणात निकष पाळले गेले होते. परंतु, यंदाच्या निवडीत मात्र ते पायदळीच तुडविले गेले आहेत, असा सूरही या तज्ज्ञांच्या चर्चेतून निघाला. स्वीकृत सदस्यांच्या निवडी करताना शासन निकषात बसविण्याचा केवळ मेळ या दोन्हीही पक्षांनी घातला आहे. सेवाभावी संस्थेतील पदाधिकारी आणि अनुभवी असा कागदोपत्री मेळ दोन्ही पक्षांनी घातला आहे.