पडेगाव नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणातून चौपदरी बांधकाम करणे, दौलताबाद टी पॉइंटपासून ते धुळे - सोलापूर महामार्गापर्यंत रस्त्याचे चौपदीकरण करणे. शरणापूर - साजापूर ते पंढरपूरमार्गे नक्षत्रवाडी-शिंदोन-भिंदोन -एकोडमार्गे पाचोड भालगाव-शेंद्रा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरणातून तीन पदरी बांधकाम करणे, कांचनवाडी - सातारा - देवळाईमार्गे आडगाव - निपाणी कुंभेफळमार्गे लाडगाव रस्ता रुंदीकरणासह मजबूत करणे, पैठण रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणातून बांधकाम करणे, देवळाई ते शिवगड तांडा, गाडीवाट, कचनेर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे, गिरनेर तांडा, बोकुड जळगाव सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, औरंगाबाद पैठण रस्त्यावर सी.डी. वर्कचे बांधकाम करावे आदी मागण्या आमदार शिरसाट यांनी चव्हाण यांना दिलेल्या पत्रात केल्या आहेत.
मतदारसंघातील कामांना मंजुरी द्या; संजय शिरसाट यांचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST