भराडी प्रकल्पात उपलब्ध असणारे ६.७९५ दलघमी पाणी पूर्णा नदीत वळवून त्यात ठरावीक अंतरांवर पाच ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यास मान्यता मिळाली आहे. नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. भराडी प्रकल्पामुळे सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असून सिंचन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. तोंडापूर मध्यम प्रकल्पातून अजिंठा लेणी पाणी पुरवठा योजनेसाठी ०.८५५ दलघमी पाणी साठा आरक्षित आहे. मात्र, या पाणीसाठ्याचा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळे अजिंठा लेणी पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण कमी करून उर्वरित पाणीसाठ्यापैकी ०.४८ दलघमी इतका पाणीसाठा फर्दापूर पाणी पुरवठा योजनेसाठी आरक्षित करण्याच्या मागणीचा प्रस्ताव राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सादर केला होता. हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिले.
चौकट
गोदावरी उपखोऱ्यातूनही मिळणार पाणी
पाणी लवादाने मंजूर केलेल्या गोदावरी खोऱ्यातील १०२ टीएमसी पाण्यापैकी ७३ टीएमसी पाण्याचा संचय विविध प्रकल्पांच्या माध्यमातून उपखोऱ्यात झालेला आहे. शासनामार्फत नदीजोड प्रकल्पाद्वारे समन्यायी पद्धतीने पुनर्नियोजन करून पाणी वाटपाबाबत कार्यवाही सुरू आहे. पूर्णा उपखोऱ्यातील सिद्धेश्वर धरणात अंदाजे ५.६ टीएमसी पाण्याचे नियोजन केल्यास त्याचा सिल्लोड सोयगाव मतदार संघाला लाभ होईल. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाणी पुनर्नियोजनाचे आदेश संचालकांना दिले आहेत.
फोटो कॅप्शन : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिसत आहे.
060521\img_20210506_172745.jpg
कॅप्शन
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सोबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिसत आहे