औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेला समितीच्या मासिक बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या उपकरातून सन २०१४-१५ या वर्षासाठी १ कोटी ८७ लाख रुपये खर्चाची ही योजना आहे, अशी माहिती समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले यांनी दिली. चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली बैैठक झाली. १ कोटी ८७ लाख रुपये निधीतून ६० लाख रुपयांची झेरॉक्स मशीन खरेदी केली जाणार आहे. त्यात ३० लाख रुपये अपंग व ३० लाख रुपये मागासवर्गासाठी आहेत. ३० लाख रुपयांची मिरची कांडप, ३० लाखांची सायकल, ३० लाखांची ताडपत्री व ३० लाखांची टीनपत्रे योजना राबविली जाईल. सायकल व टीनपत्रे वगळता इतर साहित्य शासनाच्या दरसूचीनुसार खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या, तर सायकल व टीनपत्रे खरेदीसाठी ई निविदा काढल्या जातील. वैयक्तिक लाभाच्या लाभार्थ्यांच्या यादीला यावेळी मंजुरी देण्यात आली. मागील ६ वर्षांपासून साधने-साहित्य पडूनलाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे पडून राहिलेल्या सन २००७-०९ पासूनच्या शिलकी विविध साधने- साहित्याच्या वितरणासाठी लाभार्थ्यांच्या यादीला यावेळी मंजुरी देण्यात आली.
१.८७ लाखाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेस मंजुरी
By admin | Updated: August 13, 2014 01:44 IST