भराडी प्रकल्पात उपलब्ध असणारे ६.७९५ दलघमी पाणी पूर्णा नदीत वळवून, त्यात ठरावीक अंतरावर पाच ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले, तर सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असून, सिंचन क्षेत्रातही मोठी वाढ होणार आहे. नाणेगाव, जंजाळा आणि अंभई या ठिकाणी बंधारे बांधण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या बंधाऱ्यांमुळे शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. तसेच अजिंठाजवळ निजामकालीन बंधारा आहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली तर, त्या भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे म्हणणे राज्यमंत्री सत्तार यांनी मांडल्यानंतर पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन काम मार्गी लावण्याचे आदेश जलसंपदामंत्री पाटील यांनी दिले.
चौकट...
जलसंपदा विभागाची जागा न. पा.ला हस्तांतरित करा
सिल्लोड येथे जलसंपदा विभागाचे विश्रामगृह आहे. मात्र सध्या त्याची अवस्था दयनीय झाली आहे. जलसंपदा विभागाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी केली. त्या जीर्ण विश्रामगृहाच्या इमारतीच्या जागेवर नवीन प्रशस्त व सुसज्ज विश्रामगृह आणि जलसंपदा विभागाचे कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले. त्यावर तपासून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.
फोटो :
210721\img-20210720-wa0440.jpg
क्याप्शन
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिसत आहे.