शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विम्याच्या ५६ प्रस्तावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:37 IST

शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले, असून त्यापैकी १३ प्रस्ताव मान्य करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले, असून त्यापैकी १३ प्रस्ताव मान्य करण्यात आले.शेती व्यवसाय करताना शेतकºयांना अनेक अडचणींना तसेच घटनांना सामोरे जावे लागते. अंगावर वीज पडणे, सर्प-विंचू दंश, वीजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे, रस्त्यावरील अपघातामुळे अनेक शेतकºयांचा मृत्यू होतो. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यावर कुटुंबाच्या उदनिर्वाह तसेच आर्थिक परिस्थिीती कमकुवत होते. त्यामुळे शासनाने अपघातग्रस्त शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करण्यासाठी २०१५-१६ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. सदर योजना नॅशनल इंन्सुरन्स कंपनी लि. पुणे या विमा कंपनीमार्फत राबविली जात आहे. शेतकºयांनी स्वत: किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नसते. शासनाकडूनच सर्व खातेदार शेतकºयांचा विमा हप्ता भरण्यात येतो. या विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतात.पात्रता व अटी - राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी, तसेच शेतकरी म्हणून त्याचे नावाचा समावेश असलेला सातबारा, किंवा नमुना ८-अ उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकºयाचे नाव सातबारावर आले असेल, असा संबधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर ६-ड) शेतकºयांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, तर अपघाताच्या स्वरूपानुसार विहित केलेली इतर आवश्यक कागदपत्रे आदींचा समावेश आहे. तालुका स्तरावर परिपूर्ण प्रस्ताव घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा कार्यालयाकडे माहिती सादर करतात, अशी माहिती कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.