शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

नगराध्यक्षासाठी पंचवीस उमेदवारांचे अर्ज ठरले वैैध !

By admin | Updated: November 3, 2016 01:40 IST

उस्मानाबाद : यावेळी नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षासह अपक्षांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे.

उस्मानाबाद : यावेळी नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षासह अपक्षांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. नगराध्यक्षासाठी ३२ जणांनी ५८ अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती ७ जणांचे अर्ज अपात्र ठरले. उर्वरित २५ पैकी प्रमुख पक्षाच्या आठ उमेदवारांसह १७ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. तर नगरसेवकासाठी २४१ जणांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासठीची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत असल्याने यानंतरच निवडणूक आखाड्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसागणिक जोर धरू लागली आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी २४ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. पक्षाकडून आपणालाच उमेदवारी मिळणार, अशी अपेक्षा ठेवून असलेल्या अनेक इच्छुकांची शेवटच्या टप्प्यात निराशा झाली. त्यामुळे संबंधितांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु, यापैकी अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्जावर पाच सूचकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या नाहीत, काहींनी केवळ सूचकांची नावे दिली तर काहींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नव्हती. त्यामुळे छाननीअंती असे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यातून बाहेर पडले. नगराध्यक्ष पदासाठी एक -दोन नव्हे, तर तब्बल ३२ जणांनी ५८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या छाननीअंती ३२ पैकी ७ जणांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. तर २५ जणांचे अर्ज वैध ठरले. यामध्ये प्रमुख पक्षाच्या आठ उमेदवारांसह १८ अपक्षांचाही समावेश आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल पाटोदेकर, शिवसेनेचे मकरंद राजेनिंबाळकर, भाजपाचे नितीन काळे, काँग्रेसचे मधुकर तावडे, बसपा (बीएसपी) चे संजयकुमार वाघमारे, आरपीआय (ए) चे संजयकुमार यादव, रासपच्या लता मुकुंद धनवडे आणि भारिपचे विकास बनसोडे यांचा समावेश आहे. तर अपक्ष म्हणून मोमीन जाफर अली हैदर अली, अमित शिंदे, अ‍ॅड. खंडेराव चौरे, विजय बनसोडे, नितीन बागल, अतुल बागल, सुरज साळुंके, सतीश दंडनाईक, अमरसिंह देशमुख, बाळासाहेब काकडे, रविनंद नामदेव ओव्हाळ, सत्तार अफसाना सत्तार अब्दुल, राजेंद्र घोडके, शेख युसूफ शमशोद्दीन, प्रदीप नेताजी साळुंके, पठाण मैन्नुदीन महमद ख्वॉजा आणि मुंडे मोहन वसंतराव यांचा समावेश आहे. दरम्यान, नगरसेवक पदासाठीही मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती सुमारे ८१ जणांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. तर २४१ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्र.१८ (अ) मधील अनुराधा वाघमारे, प्रभाग क्र.२ (ब), दीपाली धनंजय पाटील, प्रभाग ७ (अ) मधील काँग्रेसचे प्रमोद शिवाजी झेंडे, प्र्रभाग ११ (ब) मधील शिवसेचे संदीप गोरोबा सलगर यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर प्र्रभाग १५ (अ) मधील चंद्रकला राजेंद्र घोडके यांना शपथ पत्रावरील माहिती देण्यास मुदत देण्यात आली आहे. काही किरकोळ अपवाद वगळता बुधवारची छाननी प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)