शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

श्रुती भागवतप्रकरणी ‘एसआयटी’ नियुक्त

By admin | Updated: August 20, 2016 01:19 IST

औरंगाबाद : उल्कानगरी येथील श्रुती भागवत यांचा खून होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

औरंगाबाद : उल्कानगरी येथील श्रुती भागवत यांचा खून होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. श्रुती भागवत यांच्या खुनाचा तपास सीआयडी अथवा सीबीआयकडे द्यावा, यासाठी शहरातील विविध महिला संघटनांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे.उल्कानगरी येथील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) या शिक्षिकेची १८ एप्रिल २०१२ रोजी रात्री त्यांच्या फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांचे प्रेत गादीमध्ये गुंडाळून ती गादी पेटवून दिली होती. पेटलेल्या गादीच्या धुराचे लोट अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या अन्य शेजाऱ्यांच्या घरात गेल्यानंतर ते झोपेतून जागे झाले. भागवत यांच्या घरात आग लागली असावी, या शंकेने त्यांनी त्यांच्या घरात डोकावून पाहिले असता खुनाची घटना उघडकीस आली. घटनेच्या दिवशी श्रुती यांचे पती विदेशात तर मुलगा शिक्षणानिमित्त पुणे येथे होता. शांत आणि उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्कानगरीत झालेल्या या हत्येने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त संजीवकुमार यांनी युद्धपातळीवर तपास केला. मात्र मारेकऱ्यापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही. २०१२ साली महिला संघटनांनी आंदोलने केली होती. तपास सीआयडी अथवा सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाने तपास एसआयटीकडून करण्याचा निर्णय घेतला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच एसआयटी स्थापन केली आहे. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, महिला पोलीस उपनिरीक्षक भांगे आणि चार कर्मचाऱ्यांचे हे पथक आहे.ह्यएसआयटीमार्फत तपास सुरूउपायुक्त आटोळे म्हणाले की, शासनाच्या आदेशाने नुकतीच श्रुती भागवत यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीने तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेचा उलगडा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.