शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

मूळ जीएसटी लागू करा

By admin | Updated: December 20, 2015 00:10 IST

औरंगाबाद : केंद्र सरकार व विविध राज्यांच्या सरकारांमध्ये याविषयी मतभेद असल्याने तो मंजूर होण्यास विलंब लागत आहे.

औरंगाबाद : उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी गुडस् अँड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) कळीचा मुद्दा बनला आहे. मात्र, केंद्र सरकार व विविध राज्यांच्या सरकारांमध्ये याविषयी मतभेद असल्याने तो मंजूर होण्यास विलंब लागत आहे. पण जीएसटीला मंजुरी मिळाली तरीही त्यात केंद्राची वेगळी खिडकी, राज्याची वेगळी खिडकी असेल तर अशा जीएसटीने अर्थकारणावर काहीच परिणाम होणार नाही. देशभरात कर वसुलीसाठी एकच खिडकी पद्धत असावी, असा मूळ जीएसटीचा मसुदा मंजूर झाला तरच देशाचा विकास दर वाढेल, असे मत महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी व्यक्त केले. राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राच्या काय समस्या आहेत. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या योजना राबवाव्यात, जेणेकरून त्याचा फायदा राज्याच्या विकास वाढीला होईल, याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे पथक सध्या मराठवाड्यात दौरा करीत आहे. या अनुषंगाने शनिवारी हे पथक औरंगाबादेत आले होते. शंतनू भडकमकर म्हणाले की, ई-गव्हर्नर राबविण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. सर्व परवानग्या आॅनलाईन करण्यास आम्ही तयार आहोत, पण जेथे इंटरनेटचा वेग कमी आहे, तेथे नेट कनेक्ट होत नाही किंवा भारनियमन जास्त असते, अशा ठिकाणी परिस्थितीनुसार हाताने फॉर्म भरण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. प्रत्येक औद्योगिक वसाहतीत वाहतूकनगर उभारण्यात यावे, याविषयी सरकारशी चर्चा करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रपरिषदेत संघटनेचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष विलास शिरुरे, समीर दुधगावकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा आदींची उपस्थिती होती. राजकीय नेतृत्व कमकुवत; हीच व्यापारी नेतृत्वाला संधी महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांनी सांगितले की, येथील व्यापारी व उद्योजकांच्या प्रतिनिधींनी स्थानिक संघटनेत समाधान न मानता राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या ‘एमएसीसीआयए’ या संघटनेत आपले नेतृत्व कौशल्य दाखवून राष्ट्रीय पातळीवर काम करावे. सध्या मराठवाड्यातील राजकीय नेतृत्व कमकुवत आहे. यामुळे व्यापारी व उद्योजकांना सर्वोत्तम कार्य करण्याची हीच संधी असून, संघटनेच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवून उद्योग, व्यापाऱ्यांतील विविध प्रश्न सोडवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.