शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील सुपीक जमिनीवर अतिवृष्टीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:05 IST

विकास राऊत औरंगाबाद : मराठवाड्यात मागील तीन वर्षांपासून सुपीक जमीन वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिवृष्टीमुळे हा सगळा प्रकार ...

विकास राऊत

औरंगाबाद : मराठवाड्यात मागील तीन वर्षांपासून सुपीक जमीन वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिवृष्टीमुळे हा सगळा प्रकार होत असून, यंदाही सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास सुपीक जमीन वाहून जाण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. तीन वर्षांत सुमारे १० हजार हेक्टर जमीन अतिपावसामुळे खरडून गेली.

२०२० साली झालेल्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत सुमारे ६ हजार ८२१ हेक्टर जमीन वाहून गेली. यामध्ये सर्वाधिक जमीन उस्मानाबाद, जालना जिल्ह्यातील होती. औरंगाबाद जिल्ह्यातील ५० हेक्टर, जालन्यातील २५०० हेक्टर, नांदेडमधील ६६, लातूरमधील १ हजार तर उस्मानाबादमधील ३ हजार १६५ हेक्टर जमीन वाहून गेली.

२०१९ साली झालेल्या पावसाळ्यात विभागातील सुमारे ३ हजार हेक्टर जमीन वाहून गेली. ३ इंचापेक्षा अधिक जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांसह मोठे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना मावेजा देण्याबाबत शासनाकडे प्रस्तावही देण्यात आले होते. ३७ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर नुकसानभरपाईचे प्रस्ताव दिले, मात्र त्यातून शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनी पूर्ववत झाल्या नाहीत.

२०१८ सालीदेखील मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील जमीन वाहून गेली. १ हजार हेक्टरच्या आसपास जमीन वाहून गेल्याचे पंचनामे प्रशासनाने केले होते.

जमीन खरडणे, खचण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच नदीपात्र बदलल्यामुळे शेतजमीन वाहून गेली. शासनाकडे नुकसानभरपाईचे प्रस्ताव प्रशासनाने पाठविले होते. तीन वर्षांत सुमारे २ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले.

का वाहून जात आहे जमीन?

विभागातील जमीन का वाहून जात आहे, याबाबत जल व भूमी व्यवस्थापन वाल्मी येथील मृदू शास्त्रज्ञांनी सांगितले, मराठवाड्यात जमीन वाहून जाण्याची अनेक कारणे आहेत, त्यामागे पहिले कारण वृक्षतोड आहे. जमिनीचे उतार, सपाटीकरण नसल्यामुळेदेखील नुकसान होत आहे. सुपीक जमीन अतिपावसामुळे लवकर वाहून जाते. त्यासाठी पाण्याचा वेग थोपविणारी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. मागील तीन वर्षांपासून अतिपावसामुळे जमिनीचे नुकसान होत आहे.