बीड : येथे २९ मार्चपासून पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात होणार असून ३४ जागांसाठी तब्बल सहा हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.पोलीस मुख्यालयावर भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात शारीरिक क्षमता चाचणी होणार असून त्यानंतर गृहविभागाच्या सूचनेनुसार लेखी परीक्षा होईल. लेखी व शारीरिक चाचणी परीक्षा प्रत्येकी शंभर गुणांच्या असतील. ३४ जागेसाठी ६ हजार ३०० उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज आले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने भरतीसाठी बोलावण्यात येणार आहे. भरतीच्या अनुषंगाने सोमवारी कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम होणार आहे. उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी शारीरिक क्षमता चाचणी सकाळी दहा वाजेपर्यंत उरकण्यात येणार आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून जागोजागी तंबू उभारले जाणार आहेत. पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सहा हजारांवर अर्ज ३४ जागांसाठी दाखल
By admin | Updated: March 28, 2016 00:19 IST