शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा परिसराला आले बेटाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी, भीमवाडी, लक्ष्मी काॅलनी, औरा व्हिलेजलगतचा परिसर पावसाळा आला, ही बेटाच्या सान्निध्यात राहिल्याचा भास ...

औरंगाबाद : सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी, भीमवाडी, लक्ष्मी काॅलनी, औरा व्हिलेजलगतचा परिसर पावसाळा आला, ही बेटाच्या सान्निध्यात राहिल्याचा भास येथील नागरिकांना होत आहे. मनपा किंवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील समस्यांकडे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सातारा परिसरातील अनेक कुटुंब घर रिकामे करून, दुसरीकडे भाड्याच्या खोलीत राहावयास गेले, तर अनेक जण जीव धोक्यात घालून कुटुंबासह राहत आहेत. दिवसभर कामाला जायचे आणि घरी कुटुंबात यायचे पाऊस आला, तर घरात पाणी शिरते की काय, अशा भीतीने डोळ्याला डोळाही लागत नाही. मनपाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी कैफियत मांडली, परंतु त्यावर काहीही तोडगा निघाला नाही.

यांच्या घरात व अंगणात पाणी...

सुमंतराव साळवे, गजानन कुलकर्णी, माणिक गायकवाड, सतीश कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, सुलभा देशपांडे यांच्या घरात व अंगणात पाणी शिरले असून, मोठा पाऊस आला, तर कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न उद्‌भवला आहे.

आयुक्तांनी दौरा मारून केली पाहणी...तोडगा नाही

सातारा : देवळाई परिसरातील विविध वसाहतींचा दौरा आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह केला, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, परंतु त्यावर ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही. अजून किती दिवस नागरिकांना पाण्यात राहायचे, असा सवाल आहे.

- राहुल शिंदे, रहिवासी.(प्रतिक्रिया)

औराव्हिलेज परिसरालगत सांडपाण्याचा, तसेच पावसाच्या पाण्याचे तळे साचते, त्याच्या सफाईसाठीही कुणीच पुढे येताना दिसत नाही. अधिकाऱ्यांना नागरिकांनी समस्या सांगून त्याचा काहीही उपयोग होत नाही. सांडपाण्याचा योग्य निचरा केल्यास, परिसर स्वच्छ व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिल.

- सोहेल सय्यद, रहिवासी. (प्रतिक्रिया)

पथक त्या परिसराची पाहणी करणार...

सातारा : देवळाईच्या अनेक वसाहतीत सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या उद्‌भवते. शक्यतो, पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. पथक घटनास्थळाची पाहणी करणार असून, पाणी तुंबण्याचे काय कारण आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठाकडे तो अहवाल पाठविणार आहे.

- डॉ.संतोष टेंगळे, उपायुक्त मनपा

कॅप्शन

सातारा परिसरात पावसाचे पाणी तुंबले की, या पाण्यातून घरात जाताना साप व बेडूक दिसतात. जीव मुठीत धरून नागरिकांना राहावे लागत आहे. हे सातारा भागातील हायकोर्ट कॉलनीलगतचे चित्र.