शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पीकपालट करण्याचे कृषीचे आवाहन

By admin | Updated: May 24, 2016 01:04 IST

हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत

हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत अन्य पिके घेण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनात दिला आहे.हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद तर सोयाबीन पिकावर मोझॅक तर खोडमाशीची आळी, चक्रभुंगा आदी रोगांचा प्रादुर्भाव पिकावर दिसत आहे. त्यामुळे या पिकापासून कमी उत्पन्न मिळत आहे. त्यातच अत्यल्प पर्जन्यमानामुळेही पिकांची वाढ खुंटत असून, उत्पादनात कमालीची घट होत आहे. नेहमीच पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या पिकांमुळे जमिनीचाही पोत बिघडून जातो. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी येत्या खरीप हंगामात पिकात बदल करणे गरजेचे आहे. विशेष करुन सोयाबीन व कापूस हे पीक वगळून इतर ज्वारी, बाजारी, तूर, तीळ आदी पिकांची पेरणी करावी. यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यासाठी १० लाख ४७ हजार ९१ मेट्रिक टन गरज असून, महाबीजमार्फत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत ज्वारीसाठी १ हजार १५४ तर बाजरीसाठी ८.८५, मूग १ हजार २२, उडीद ७८२, तूर ४ हजार ५८, तीळ ९९ क्विंटल, सोयाबीन ९६ हजार १४७, इतर पिके ४८ क्विंटल लागणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आराखडा तयार केला असून, एवढ्या बियाणांची मागणीही केली आहे. सन २०१३- १४- १५ या वर्षाच्या तुलनेत सन २०१६- १७ मध्ये जास्त प्रमाणात बियाणे लागणार आहे. (प्रतिनिधी)