शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रॅकवर ॲपेरिक्षा आदळली; दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:04 IST

चितेगाव : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर एक प्रवासी वाहतूक करणारा ॲपेरिक्षा जोरात धडकला. या ...

चितेगाव : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर एक प्रवासी वाहतूक करणारा ॲपेरिक्षा जोरात धडकला. या अपघातात रिक्षामधील दोन जण ठार झाले. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील गेवराई येथे घडली.

औरंगाबाद-पैठण रस्त्यावरून औरंगाबादहून भरधाव वेगाने बिडकीनकडे ॲपेरिक्षा(क्र. एम.एच.२० ई एफ १२९४) जात होता. गेवराई येथे वळण रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक(क्र. एम.एच २१ एक्स ४०३०)वर सदर ॲपेरिक्षा जोराने आदळला. या अपघातात ॲपेरिक्षामधील इसा हमीद जिलानी चाऊस(३०) व अफरोज सालर पठाण(३०, दोघे रा. बिडकीन, ता. पैठण) हे गंभीर जखमी झाले. जखमींना गेवराई ग्रामपंचायत सदस्य रऊफ शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ बिडकीन येथील रुग्णवाहिकेतून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मावळली. या अपघातात ऑपेरिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

दोघेही जिवलग मित्र

या अपघातात ठार झालेले या इसा हमीद जिलानी चाऊस व अफरोज सालर पठाण हे दोघेही बिडकीन येथील रहिवासी असून दोघेही बालपणापासून जिवलग मित्र होते. दोघांचाही मृत्यू झाल्यानेे बिडकीन गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी चिकलठाणा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपत राठोड करीत आहे.

फोटो : औरंगाबाद पैठण रस्त्यावरील उभ्या ट्रकवर आदळल्यानंतर ॲपेरिक्षा असा चेंदामेंदा झाला होता.