शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

५९ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:08 IST

नाफेड हमीभाव केंद्रावरील बहुचर्चित तूर खरेदी घोटाळ्यातील ५९ संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे,

जालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील बहुचर्चित तूर खरेदी घोटाळ्यातील ५९ संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे, तर एका शेतकºयाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनी तूर विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या तूर विक्री घोटाळ्यात सहभागी १८ व्यापारी ४९ शेतकरी व अन्य तिघांवर २ सप्टेंबर रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील ७० संशयितांपैकी ६० जणांनी ३० अर्जांद्वारे जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती. या अर्जावरील सुनावणी या पूर्वी दोनदा पुढे ढकलण्यात आली होती.शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश अनघा रोटे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत ५९ संशयितांचे २९ अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले. तर सुमीत दिनेश पवार या एकमेव शेतकºयाचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे यांनी काम पाहिले. अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यामुळे या प्रकरणातील संशयितांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.