शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरांच्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:50 IST

शहरासह जिल्हाभरात मोबाईल लंपास करणाºया अनेक टोळीचा आतापर्यंत भाग्यनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ शहरातील अंबिकानगर येथे रस्त्यावरुन जाणाºया एका युवकाचा मोबाईल चोरीस गेल्यानंतर तीन तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळून आणखी एक टोळी उघडकीस आणली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरासह जिल्हाभरात मोबाईल लंपास करणाºया अनेक टोळीचा आतापर्यंत भाग्यनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ शहरातील अंबिकानगर येथे रस्त्यावरुन जाणाºया एका युवकाचा मोबाईल चोरीस गेल्यानंतर तीन तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळून आणखी एक टोळी उघडकीस आणली आहे़यापूर्वी भाग्यनगर पोलिसांनी मोबाईल चोरट्यांच्या अनेक टोळ्या पकडल्या आहेत़ त्यांच्याकडून हजारो मोबाईलही जप्त केले आहेत़ शहरातील अंबिका मंगल कार्यालय रस्त्यावरुन चंद्रकांत सुभाषराव मोरे (रा़साफल्यनगर) हे पायी जात होते़ त्यावेळी छत्रपती चौक येथे मोरे यांच्या पाठीमागे असलेल्या तिघांनी त्यांना धक्का दिला़ त्याचवेळी त्यांच्या खिशातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला़ ही बाब मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच मागे वळून पाहिले़ मोबाईलचोरटा मागे सरकला आणि अन्य दोघे जण मोरे यांच्यासमोर आले़ मोरे यांनी मागील युवकाला मोबाईलबाबत विचारणा केली असता, तिघेही त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावले़ त्यानंतर मोरे यांनी लगेच भाग्यनगर ठाण्यात धाव घेत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांची भेट घेतली़ याप्रकरणी पोनि़ चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पवार, सुभाष आलोने, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड यांनी सापळा रचून तीन तासांच्या आता विकी ऊर्फ चिकी सुखदेव पोटारे (रा़ जयभीमनगर) याला ताब्यात घेतले़पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच टोळीतील इतर दोन साथीदारांची नावेही सांगितली़ सध्या हे दोन्ही आरोपी फरार आहेत़ अटक केलेला आरोपी हा सराईत चोरटा असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़