शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

पाणीपुरवठा योजनेसाठी आणखी २१ कोटींचा निधी

By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST

परभणी: शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत पुन्हा महानगरपालिकेला शासनाकडून २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.

परभणी: शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत पुन्हा महानगरपालिकेला शासनाकडून २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली. परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी युआयडी- एसएसएमटी योजनेंतर्गत १९६ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. या योजनेंतर्गत १० कोटी ५० लाख रुपयांची लोकवर्गणी पालिकेला भरावयाची असून आतापर्यंत पालिकेने जवळपास ४ कोटी ५० लाख रुपयांची लोकवर्गणी शासनाकडे जमा केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९० कोटी रुपये पालिकेला भेटले असून या निधीतून येलदरी ते परभणीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम झाले आहे. आता जलशुद्धीकरण केंद्र व शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी पालिकेला निधीची आवश्यकता आहे. या अनुषंगाने पालिकेला निधी मिळावा, याकरीता नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री सुरेश धस, महापौर प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत महापौर देशमुख यांनी पालिकेला निधीची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने पालिकेला २१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा निधी खर्च केल्यानंतर आणखी ३० कोटी रुपयांचा निधी महापालिकेस शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे महापौर प्रताप देशमुख यांनी सांगितले.(प्रतिनिधी)मिळालेल्या निधीतून होणारी कामेपालिकेला प्राप्त झालेल्या २१ कोटी रुपयांच्या निधीतून जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम, दोन जलकुंभ, अशुद्ध पाणीगुरुत्व वहिनी, अंतर्गत पाईपलाईन आदींची कामे होणार आहेत. तसेच जलकुंभासाठी गंगाखेड रोडवर उड्डाणपुलाजवळील जागा तसेच जलशुद्धीकरण केंद्रासाठी जिंतूर रोडवरील गोरक्षणाच्या जागेचा अधिग्रहाणासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच सदरील जागा महापालिकेला हस्तांतरित होणार असल्याचे देशमुख म्हणाले.