शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

‘एमसीआय’च्या धास्तीने वाढल्या आणखी १५० खाटा

By admin | Updated: May 22, 2017 00:04 IST

लातूर : एमसीआयच्या तपासणीच्या धास्तीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : एमसीआयच्या तपासणीच्या धास्तीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. तपासणी दरम्यान कुठल्याही त्रुटी निघू नयेत म्हणून प्रशासनाने आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली आहे. त्यामुळे सर्वोपचारमध्ये आणखीन १५० खाटा वाढल्या आहेत. आता खाटांची संख्या ७७० अशी झाली आहे. खाटा वाढल्यामुळे रुग्णांना आणखीन सुविधा मिळणार आहेत.शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळतात म्हणून जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी रुग्णालय परिसरात जणू रुग्णांचा मेळाच जमल्याचे पहावयास मिळते. सर्वोपचारमध्ये दररोज १२०० पेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी नोंदणी करतात. सर्वोपचारमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता तपासणी कक्षाची इमारत वगळता अन्य तीन इमारती आहेत. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय सन २००२ मध्ये १०० खाटांचे होते. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत असल्याने साडेचार वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरूही झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे ६२० खाटांचे होते. परंतु, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार खाटांची संख्या कमी होती. दरम्यान, गत काही दिवसांपूर्वी या रुग्णालयाचे परिक्षण नवी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया) होणार असल्याचे निश्चित झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने या परिक्षणात कुठल्याही त्रुटी निघू नयेत, याची दक्षता घेतली. त्यामुळे रुग्णालयातील काही वॉर्डांची फेररचना केली. त्याचबरोबर खाटांच्या संख्येत वाढ केली. खाटांची ही वाढ दीडशे अशी असून, आता ७७० अशी खाटांची संख्या झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची आता होणारी थोडीफार गैरसोयही दूर होणार आहे.