वसमत : वसमत नांदेड रस्त्यावरील जिंतूर टी पॉर्इंटवर निवडणूक विभागाकडून नियुक्त स्थिर पथकास शनिवारी एका कारमध्ये १ लाख १० हजार रुपये सापडले. या रकमेचा हिशेब न दिल्याने रक्कम कोषागारमध्ये जमा केली आहे. जी. बी. पवार, डी. के. आझादे, पो. कॉ. माने, हुरगुळे, कासले आदींच्या पथकाने वाहन तपासणी अभियान सुरु केले आहे. तपासणीत शनिवारी दुपारी हिंगोलीहून नांदेडमार्गे जाणारी कार एम. एच. ३८ - ६३१३ मध्ये १ लाख १० हजार रुपये सापडले. या रकमेचा योग्य तपशील वाहनातील कोणालाही देता आला नाही. त्यामुळे रक्कम व वाहन वसमत तहसीलमध्ये आणण्यात आले. तहसीलदार अरविंद नरसीकर यांच्या आदेशाने रक्कम कोषागारामध्ये जमा करण्यात आली आहे. शुक्रवारी जप्त केलेले २ लाख ७९ हजार रुपयेही कोषगारात जमा केले आहेत.
आणखी १.१0 लाख जप्त
By admin | Updated: September 20, 2014 23:39 IST