शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेनामी मालमत्ता आयकरच्या रडारवर

By admin | Updated: July 15, 2017 00:54 IST

औरंगाबाद : आयकर विभागाने बेनामी मालमत्तेविरोधात रणशिंग फुंकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आयकर विभागाने बेनामी मालमत्तेविरोधात रणशिंग फुंकले आहे. बेनामी मालमत्ता शोधण्यासाठी खास बेनामी प्रोव्हेबिशन युनिट (बीपीयू)ची स्थापना करण्यात आली आहे. या नवीन विभागाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. एक व्यक्ती काळ्या पैशातून मालमत्ता खरेदी करते, पण त्या मालमत्तेस दुसऱ्या व्यक्तीचे नाव दिले जाते. ज्या व्यक्तीच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते तिला बेनामदार असे म्हणतात आणि त्या मालमत्तेला बेनामी म्हणतात. ज्या व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे खर्च केले आहेत ती खरी या मालमत्तेची मालक असते आणि ज्याच्या नावे संपत्ती असते तो नामधारी असतो. जो खरा मालक आहे त्यालाच त्या संपत्तीचा वापर करायला मिळतो अथवा त्यावर मिळणारे भाडे तो स्वत:कडे ठेवतो. अशा बेनामी मालमत्ताधारकांना शोधण्यासाठी आयकर विभागाने बीपीयू विभाग तयार केला आहे. याचे कार्यालय नाशिक येथे आहे. त्यासाठी खास आयकर अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. बीपीयू या विभागांतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खान्देश व मराठवाडा विभागाचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रधान आयकर आयुक्त श्रीदयाल श्रीवास्तव यांनी सांगितले की, बेनामी मालमत्तेवर कारवाई करण्यासाठी १९८८ मध्ये बेनामी प्रॉपर्टी अ‍ॅक्टची निर्मिती करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात याची प्रभावीपणे अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे. बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) सुधारित कायदा २०१६ नुसार नाशिक येथील आयकर विभागात ‘बीपीयू’ विभाग कार्यरत झाला आहे. बेनामी मालमत्ता शोधणे, त्याचा अहवाल तयार करणे आदी प्रक्रियेतून सिद्ध झालेली बेनामी मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.