शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्या अखेर जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:23 IST

पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्या अखेर शिवजयंतीच्या मुहूर्तावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जाहीर केल्या. सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, गोवर्धन कोळेकर, हनुमंतराव भापकर यांच्यासह १४ निरीक्षक आणि १६ सहायक निरीक्षकांंचा बदलीत समावेश आहे.

ठळक मुद्दे१४ निरीक्षक आणि १६ सहायक निरीक्षक : सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, गोवर्धन कोळेकर, हनुमंतराव भापकर यांचाही बदलीत समावेश

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्या अखेर शिवजयंतीच्या मुहूर्तावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जाहीर केल्या. सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, गोवर्धन कोळेकर, हनुमंतराव भापकर यांच्यासह १४ निरीक्षक आणि १६ सहायक निरीक्षकांंचा बदलीत समावेश आहे.छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे यांची बदली वाहतूक विभागात करण्यात आली असून, त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे हनुमंतराव भापकर यांना शहर विभागासह छावणीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. गोवर्धन कोळेकर यांना शहर विभागातून विशेष शाखेत पाठविले आहे.पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड क्रांतीचौकातून एमआयडीसी वाळूजला, तर अनिल आडे यांना वेदांतनगरहून सातारा ठाण्यात पाठविले आहे. सातारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे (नियंत्रण कक्ष),वाळूज वाहतूक शाखेचे मनोज पगारे (छावणी ठाणे), नियंत्रण कक्षातील उत्तम मुळक (क्रांतीचौक पोलीस ठाणे), छावणी वाहतूक शाखेचे मुकुंद देशमुख (हर्सूल पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील अशोक गिरी (मुकुंदवाडी पोलीस ठाणे), सिडको वाहतूक शाखेचे हनुमंत गिरमे (जवाहरनगर पोलीस ठाणे), सायबर सेलचे संदीप गुरमे (वाळूज पोलीस ठाणे), विभागातील रामेश्वर रोडगे यांना वेदांतनगर पोलीस ठाणे मिळाले आहे. वाळूज ठाण्याचे सतीश टाक बीडीडीएस आणि सिडको ठाण्याच्या निर्मला परदेशी यांची बदली सिडको वाहतूक शाखेला झाली आहे. मुकुंदवाडी ठाण्याचे नाथा जाधव वाळूज वाहतूक शाखेला गेले आहेत. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे शरद इंगळे यांना छावणी वाहतूक शाखेत पाठविले आहे.सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड बेगमपुरा ठाण्यातून सुरक्षा विभागात, साहेबराव कांबळे जवाहरनगरातून नियंत्रण कक्षात, तर एमआयडीसी सिडकोचे राहुल जाधव यांची बदली नियंत्रण कक्षात झाली आहे. एमआयडीसी वाळूजचे विजय घेरडे उस्मानपुरा, तर साईनाथ गिते जिन्सी ठाण्यातून वेदांतनगरात गेले आहेत. आशा भांगे यांची बदली सिटीचौकहून एमआयडीसी वाळूज ठाण्यात झाली. वेदांतनगर ठाण्यातील वनिता चौधरी यांची बदली जिन्सी ठाण्यात करण्यात आली आहे. मनोज बहुरे यांची बदली सातारा ठाण्यातून वाहतूक शाखेला केली आहे. उर्वरित बदल्या अशा (कंसात सध्याचे ठिकाण)वामन बेले (उस्मानपुरा पोलीस ठाणे)-नियंत्रण कक्षात,सिकंदर खान समशेर खान (सिटीचौक पोलीस ठाणे) - पैरवी अधिकारी,सतीश जाधव (क्रांतीचौक ठाणे) - वाहतूक शाखा,शांतीलाल राठोड (शहर वाहतूक शाखा)- क्रांतीचौक ठाणे,शेख अखमल (शहर वाहतूक शाखा)- एमआयडीसी सिडको,शेषराव खटाणे (छावणी वाहतूक शाखा)- सिटीचौक पोलीस ठाणे,राहुल सूर्यतळ (गुन्हेशाखा)- क्रांतीचौक पोलीस ठाणे,- घनश्याम सोनवणे (पीआरओ) - पुंडलिकनगर पोलीस ठाणे.पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे व ठाण्यातून कार्यमुक्त केल्याचा दिनांक कार्यालयास कळवावा, असेही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांंनी आदेशित केले आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसTransferबदली