बदनापूर : तालुक्यातील वाकुळणी येथे संत वांड्मय सेवा संघाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप रविवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी २५ हजार भाविकांसह अनेक लोकप्र्रतिनीधी व विविध राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तालुक्यातील संत वांड्मय सेवा संघ वाकुळणी या वारकरी संस्थेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाकुळणी येथे गत सात दिवसांत भव्य गाथा पारायण, हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, संगीत भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील अनेक नामवंत प्रवचनकार,कीर्तनकार व वक्त्यांनी सहभागी होऊन हजारो भक्तांना मार्गदर्शन केले. रविवारी समारोपप्रसंगी सकाळी संत वाड:्मय सेवा संघाचे अध्यक्ष ह़भ़प़पंढरीनाथ तावरे नाना महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर सेवा संघाच्या वतीने उपस्थित संत व राजकीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे व आ नारायण कुचे यांनी हेलिकॉप्टरमधून उपस्थित संत- महंतांवर पुष्पवृष्टी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, आ. नारायण कुचे, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. अप्पासाहेब चव्हाण, माजी आ. शकरराव वाकुळणीकर, माजी आ. संतोष सांबरे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, बबलू चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास मदन, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष वसंत जगताप, हरीश्चंद्र शिंदे, बाळासाहेब वाकुळणीकर, विलासराव औताडे यांच्यासह संत-महंत व हजारो भक्तगण उपस्थित होते.या कार्यक्रमाचा समारोप श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष ह़भ़प़बाळासाहेब काशीद यांनी केला. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. (वार्ताहर)
वाकुळणी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
By admin | Updated: December 25, 2016 23:55 IST