नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्ष लोटले़ मात्र मारेकऱ्यांचा तपास लावण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे़ याच्या निषेधार्थ बुधवारी अंनिस व परिवर्तनवादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली़शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर मानवी साखळी तयार करुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ अंनिस, राजकीय पक्ष, परिवर्तनवादी जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला़ यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात पोलिस व राज्य शासनाच्या निषेधाचे फलक झळकत होते़ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून डॉ़ दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली़ आंदोलनात माजी खा़ डॉ़ व्यंकटेश काब्दे, माजी आ़ गंगाधरराव पटणे, डॉ़ हंसराज वैद्य, गुणवंत पाटील, कॉ़ प्रदीप नागापूरकर, अॅड़ धोंडीबा पवार, फारुख अहमद, डॉ़ किरण चिद्रावार, सूर्यकांत वाणी, सूर्यकांत धोंगडे, प्रा़ डॉ़ लक्ष्मण शिंदे, भारतीबाई सदावर्ते, निवृत्ती सदावर्ते, प्रा़ देवदत्त तुंगार, विजय राठोड, शिवाजी शिंदे, शहजाद जाफरी, बी़ मालती, प्रकाश पाईकराव, कॉ़ बालाजी कलेटवाड, उमेश पाटील, पुष्पा कोकीळ, गयाबाई कोकरे, विठ्ठल ढवळे, श्रीधर कांबळे, श्याम सोनकांबळे, गौतम सूर्ये, शिवाजी फुलवळे, काशिनाथ, विलास अटकोरे, बालाजी पवार, गणेश वडगावकर, स्वप्नील नरबाग, विष्णू मेहते, कल्पना ढवळे, बलराम हमंदे, अवधूत पवळे, निखील गर्जे, चित्ततोष करेवार यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, आयटक, जद (से़), आम आदमी पार्टी, एसएफआय, एआयएसएफ, जनहित सेवा मंडळ, संविधान विद्यार्थी संघटना, तन्जीम-ए-इन्साफ, लाल बावटा हॉकर्स युनियन आदींचे पदाधिकारी उपस्थित होते़(प्रतिनिधी)
अंनिस,परिवर्तनवादींची निदर्शने
By admin | Updated: August 20, 2014 23:53 IST