शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविका, मदतनिसांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:46 IST

येथील जिल्हा परिषदेवर विविध मागण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी महाराष्टÑ राज्य अंगणवाडीसेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा परिषदेवर विविध मागण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी महाराष्टÑ राज्य अंगणवाडीसेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडीसेविका व मदतनिसांचा मागण्या शासनाकडून मान्य केल्या जात नाहीत. अनेकदा मोर्चे काढूनही काहीच उपयोग झालेला नसल्याचा रोष या कर्मचाºयांमध्ये दिसून येत आहे. शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अंगणवाडीसेविका व मदतनिसांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजी पुन्हा जि.प.वर विविध मागण्यासाठी मोर्चा काढला.मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने अंगणवाडीसेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडीसेविकांचे मानधन पाच तारखेपर्यंत द्यावे, प्रकल्पनिहाय प्रलंबित मानधनाचा आढावा घेऊन थकित मानधन तत्काळ अदा करावे, अंगणवाडीसेविकांचे मानधन वाढविण्यात यावे, तसेच ‘पीएफएमएस’द्वारे होत असलेले मानधन, बºयाच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मिळत नाही. त्यामुळे मानधन मिळण्यातील त्रुटी दूर करुन मानधन मिळवून द्यावे, अंगणवाडीसेविका व मदतनिस दोघींनाही एकदाच एक महिना उन्हाळी सुट्या द्याव्यात, एक महिन्यांची आजारी रजा द्यावी अशा १३ मागण्यांसाठी जि. प.वर मोर्चा काढला. यामध्ये पाचही तालुक्यातील अंगणवाडीसेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा गांधी चौक येथून जि. प. कार्यालयापर्यंत काढला होता.