औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी विशेष रेल्वेने सीमा सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले आहेत. ही रेल्वे निवडणुकीपर्यंत रिकामीच पडून राहणार होती. मग दक्षिण मध्य रेल्वेने शक्कल लढवीत या रिकाम्या रेल्वेलाच विशेष रेल्वे म्हणून ऐनवेळी जाहीर क रून टाकले. आश्चर्य म्हणजे मागणी नसलेल्या व भरपूर बस उपलब्ध असलेल्या मार्गावर ही रेल्वे धावेल. जेथे गरज व मागणी आहे त्या ठिकाणी मात्र विशेष रेल्वे अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत.दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नांदेड- औरंगाबाद, औरंगाबाद- अकोला- औरंगाबाद आणि औरंगाबाद- आदिलाबाद- नांदेड, अशी विशेष रेल्वे चालविण्यात येत आहे.दिवाळी सणाच्या सुट्यांत गावी आणि पर्यटनासाठी विविध ठिकाणी जाण्याचे नियोजन अनेकांकडून केले जाते. प्रवासासाठी किफायतशीर अशा रेल्वे प्रवासास प्राधान्य दिले जाते. दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने विशेष गाड्या जाहीर केल्या जातात. यंदाही विविध रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या जात असताना मराठवाड्यातील प्रवाशांसाठी पर्यटनाच्या ठिकाणी, लांब पल्ल्याच्या मार्गांवर अद्यापही विशेष रेल्वे सोडण्याचे जाहीर करण्यात आलेले नाही. औरंगाबादहून ज्या दोन मार्गांवर विशेष रेल्वे जाहीर केल्या, त्या मार्गांवर बससेवा उपलब्ध आहेत. तसेच निवडणुकीचा कालावधी असल्याने सध्या लांबचा प्रवास टाळला जात आहे. अशा वेळी मागणी नसतानाही निवडणूक विशेष रेल्वेच्या बळावर विशेष रेल्वे सोडण्याचे जाहीर करून रेल्वे प्रशासन मोकळे झाले आहे. निवडणुकीनंतर प्रवासासाठी लांब पल्ल्याच्या मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्याची मागणी होत आहे. आज धावणार रेल्वेसोडण्यात येणारी विशेष रेल्वे नांदेडहून ११ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वाजता निघेल आणि दुपारी ४.१० वाजता औरंगाबादला येईल. औरंगाबादहून सायंकाळी ७.१५ वाजता अकोल्याकडे रवाना होईल. रविवारी सकाळी ६.३० वाजता ती अकोल्याला पोहोचेल. त्यानंतर सकाळी ७.४५ वाजता अकोल्याहून ही रेल्वे निघून दुपारी ४.१० वाजता औरंगाबादला येईल. आदिलाबादसाठी ४.५० वाजता रवाना होईल. आदिलाबादला रात्री २.३५ वाजता पोहोचेल.
आणि ही म्हणे विशेष रेल्वे..!
By admin | Updated: October 11, 2014 00:39 IST