शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

...आणि ४२ पर्यटक बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:58 IST

अजिंठा लेणीतून पर्यटकांना घेऊन येणाºया धावत्या एस.टी. बसचा टायर स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित झाली, पण चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कफर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतून पर्यटकांना घेऊन येणाºया धावत्या एस.टी. बसचा टायर स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित झाली, पण चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला. यामुळेबसमधील ४२ पर्यटक बालंबाल बचावल्याची घटना लेणी मार्गावरील कालिंका माता मंदिर परिसरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सोयगाव बस आगाराच्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला आहे.सोयगाव आगाराचे चालक सुरवाडे हे प्रदूषणमुक्त समजल्या जाणाºया बसमधून (क्र. एमएच २० बीएल ३२८०) मधून ४२ पर्यटकांना घेऊन अजिंठा लेणीतून फर्दापूर टी पॉइंटच्या दिशेने निघाले असता उतार उतरत असताना या धावत्या बसचा टायर स्टेअरिंग रॉड अचानक तुटला.रॉड तुटताच ही बस अनियंत्रीत होऊन उतारावरील झाडावर आदळण्याच्या दिशेने झेपावली, मात्र ऐनवेळी चालक सुरवाडे यांनी प्रसंगावधान दाखवून मोठ्या कसोशीने बसवर नियंत्रण मिळवून बस रस्त्याच्या कडेवर थांबवली व बसमधील ४२ पर्यटकांना सुरक्षित खाली उतरवले. यानंतर पर्यटकांनी एस.टी. महामंडळाच्या भोंगय कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त करुन कारवाई करण्याची मागणी केली.देश-विदेशातून येणारे पर्यटक अशी गैरसोय पाहून काय प्रतिक्रिया देत असतील, याचा विचार एस.टी. महामंडळाने आता करायला हवा.