शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचा रिंगण सोहळा

By admin | Updated: June 24, 2017 23:39 IST

अंबाजोगाई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या व पालख्या अंबाजोगाईमार्गे जातात.

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या व पालख्या अंबाजोगाईमार्गे जातात. या दिंडीतील वारकरी मागील सात वर्षांपासून अंबाजोगाई येथे अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन करतात. शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील नरसीची संत नामदेव यांची पालखी, गंगाखेड येथील संत जनाबाई, कोंडूर (जि. हिंगोली) येथील संत विठोबा बाबा, गणोरी (जि. अमरावती) येथील महंमद खान महाराज यांची पालखी तर अकोला येथील भाऊसागर माऊली यांची पालखी शहरात दाखल झाली. या दिंड्यांना टाळ-मृदंगासह विठ्ठलनामाच्या गजरात योगेश्वरी मैदान येथे बँड पथक व फटाक्यांच्या आतिषबाजीत आणण्यात आले. यावेळी ध्वजारोहण, पालखी पूजन व अश्वपूजा करण्यात आली. यानंतर मनोहारी रिंगण सोहळा पार पडला.अश्व धावले रिंगणीअन् तुका झाला आकाशाएवढा..अशी अनुभूती अंबाजोगाईकरांनी अनुभवली.या सोहळ्यात सजविलेला अश्व, भगवी पताका हाती घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविलेल्या देखाव्याची भाविकांनी प्रशंसा केली. वारकऱ्यांच्या कुस्त्या, महिलांच्या फुगड्या व मैदानी खेळात भाविक तल्लीन झाले होते. यावेळी रिंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, अध्यक्ष दिलीप सांगळे, कार्याध्यक्ष बाबामहाराज जवळगावकर, उपाध्यक्ष दिलीप गित्ते, बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, पं. उद्धवराव आपेगावकर, वैजनाथ देशमुख, बळीराम चोपने, अनंत अरसुडे, अभिजीत जोंधळे, सुधाकर महाराज शिंदे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, मारूतीराव रेड्डी, बाळा पाथरकर, मुन्ना सोमाणी, योगेश कडबाने, पंकज लोमटे यांनी पालखी प्रमुखांचे स्वागत केले. अश्वरिंगण सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था स्वागत समितीच्या वतीने करण्यात आली होती. हा रिंगण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीनेही चोख नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना आनंदाने यात सहभागी होता आले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.