शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चुन्नीलाल पेट्रोलपंपावर मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 00:35 IST

औरंगाबाद :चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर मापात पाप होत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासणीत आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील जुन्या पेट्रोलपंपांपैकी एक असलेल्या अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर मापात पाप होत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा आणि वजन- मापे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त तपासणीत आढळून आला. या पंपावर पाच लिटरमागे ५५ मिली ते ७५ मिलीलिटर पेट्रोल कमी मिळत असल्याचे समोर आले. या पंपावरील महत्त्वाची उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहेत. ठाणे आणि उत्तर प्रदेशातील काही पेट्रोलपंपांच्या मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून ग्राहकांना कमी पेट्रोल दिल्या जात असल्याचे उघडकीस आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १८ जून रोजी रविवारी शहरातील चार पेट्रोलपंपांची तपासणी केली होती. मात्र या तपासणीत एकाही पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी आढळली नव्हती. मात्र शहरातील काही पेट्रोलपंपांवर पेट्रोल चोरी होत असल्याची पक्की माहिती सूत्रांकडून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना मिळाली होती. पंपचालकांची पेट्रोल चोरी तपासण्याचे तंत्रशुद्ध ज्ञान आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनाच औरंगाबादेत बोलावून कारवाई करण्याची सूचना केली. यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुरके, संतोष सुर्वे यांचे पथक बुधवारी रात्री शहरात दाखल झाले. वजन- मापे निरीक्षक, इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि शहर गुन्हे शाखेच्या एका पथकाला सोबत घेऊन गुरुवारी दुपारी ठाणे पोलिसांनी अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर धाड मारली. या धाडीत तेथील पेट्रोल आणि डिझेल वितरण करणाऱ्या यंत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी वजन- मापे विभागाने आणलेल्या पाच लिटरच्या मापात पेट्रोल घेण्यात आले असता पंपावरील आकडेवारीनुसार मापात पाच लिटर पेट्रोल टाकल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात मात्र हे माप रिकामे होते. यानंतर वजन- मापे अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष त्या रिकाम्या मापात आणखी पेट्रोल टाकले. वरून टाकलेले पेट्रोल हे काही यंत्रावर ५५ मिली, ६० मिली आणि ७५ मिलीलिटर एवढे होते. यावरून या पंपावर प्रती पाच लिटरमागे ग्राहकांना ५५ मिली ते ७५ मिलीलिटर कमी पेट्रोल दिले जात होते.शहर गुन्हे शाखेला अपयश पण...शहर गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी शहरातील चार पेट्रोलपंपांची तपासणी केली तेव्हा या सर्व पंपांवर सर्व काही अलबेल असल्याचे जाहीर केले. आज शुक्रवारी ठाणे पोलिसांच्या पथकाने सुरू केलेल्या तपासणीत पहिल्याच पंपावर इंधन चोरी होत असल्याचे समोर आले.