शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीनंतर सभेत शब्दवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:23 IST

नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची तक्रार सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या तहकूब सर्वसाधारण सभेत केली. या गंभीर प्रश्नावर पदाधिकारी व प्रशासनाने कोणतेच गांभीर्य दाखविले नाही, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण शहराची दाणादाण उडाली आहे. घर पडून आणि पुरात वाहून गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. ५० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये आजही रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहेत. त्यात भरीस भर म्हणून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले ओहत. नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची तक्रार सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या तहकूब सर्वसाधारण सभेत केली. या गंभीर प्रश्नावर पदाधिकारी व प्रशासनाने कोणतेच गांभीर्य दाखविले नाही, हे विशेष.१९ आॅगस्ट रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत वंदेमातरमच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. त्यामुळे महापौर बापू घडामोडे यांनी तहकूब सभा सोमवारी आयोजित केली होती. सभा सुरू होताच सर्वच पक्षांच्या नगरसेवक, नगरसेविकांनी अतिवृष्टीचा मुद्या उपस्थित केला. जयभवानीनगर, टाऊन हॉल परिसरातील नूर कॉलनीच्या नाल्याशेजारी राहणाºया नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार करण्यात आली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणे दोन दिवसांत काढण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. नूर कॉलनीची पाहणी आयुक्त, शहर अभियंता यांनी करून अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश महापौरांनी दिले.