कालिदास काकडे , जातेगावगेवराई तालुक्यातील जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र एक अधिकारी रजेवर तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे इतरही ठिकाणचा पदभार असल्याने येथील रूग्णसेवा सलाईनवर आहे. वेळ प्रसंगी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रूग्णांना खाजगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत आहे. जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रावर एनएमएचच्याही जागा रिक्त असल्याने वेळेवर रूग्णसेवा मिळत नाही. जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जातेगावसह नांदलगाव, रामपुरी, भेंडटाकळी, खेर्डा, काठोडा, शिरसदेवी आदी भागातील रूग्णांना रूग्णसेवा दिली जाते. यासाठी डॉ. राऊत व डॉ. वाघमारे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून डॉ. राऊत रजेवर आहेत. तर डॉ. वाघमारेंकडे इतर ठिकाणचा पदभार आहे. त्यामुळे येथे रूग्णांना वेळेवर रूग्णसेवा मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे वेळ प्रसंगी रूग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. यावर नाहक खर्च होतो. त्यामुळे येथे कायम स्वरूपी दोन डॉक्टरची मागणी आहे.सुरळीत रूग्णसेवा देऊतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एल.आर. तांदळे म्हणाले की, डॉ. राऊत रजेवर आहेत. तर वाघमारे हे तीन दिवस जातेगाव व तीन दिवस पाचेगाव येथे थांबतात. काही जागा रिक्त असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले आहे. जातेगाव येथून सुरळीत रूग्णसेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दोन वैद्यकीय अधिकारी असतानाही रूग्णसेवेचे तीन तेरा
By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST