शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

मधुमेहासोबत हृदयविकारही दूर करा...

By admin | Updated: April 7, 2016 00:28 IST

सितम सोनवणे , लातूर बीट डायबेटीज या माध्यमातून मधुमेहाची परिणिती अनेकदा हृदयविकारात होण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या जोखीममध्येही याचा समावेश असतो.

सितम सोनवणे , लातूरबीट डायबेटीज या माध्यमातून मधुमेहाची परिणिती अनेकदा हृदयविकारात होण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या जोखीममध्येही याचा समावेश असतो. तसेच धूम्रपान, लठ्ठपणा हेसुद्धा या आजाराचे जोखीम फॅक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करून मधुमेहाबरोबर हृदयविकारालाही दूर करा, असे आवाहन डॉ.एस.व्ही. कुलकर्णी व डॉ. अभय कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी केले.यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाले, हेल्थ आॅर्गनायझेशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षाचे घोषवाक्य बीट डायबेटीज अर्थात् मधुमेहाचा मुकाबला म्हणून मधुमेह या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न ‘जागतिक आरोग्य दिवसा’च्या माध्यमातून केला जात आहे. मधुमेहाची परिणिती अनेकदा हृदयविकारामध्ये होते. त्यातून रुग्ण बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आहार, व्यायाम यांचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मधुमेहाचे रुपांतर अनेकदा हृदयविकारात होण्याची शक्यता असते. मधुमेह, उच्च रक्तदाब हे सायलंट किलर म्हणून ओळखले जातात. हृदयविकाराची जोखीम त्यामध्ये येते. तसेच लठ्ठपणा, धूम्रपान या सवयींमुळे सुद्धा रुग्णांची जोखीम वाढते. त्यामुळे रुग्णांना तीन गटांत विभागले जाते. पहिला गट हा आरोग्यसंपन्न व्यक्तींचा असतो. ज्यांना कोणताही आजार किंवा व्याधी नसते, त्यांना उपचाराची गरज नसते. परंतु, आजार होऊ नये या सबबीवर शरीराची काळजी घ्यावी लागते.