शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

ओबीसींच्या प्रश्नांवरही विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:02 IST

नॉनपोलिटिकल ओबीसी, एससी, एसटी सोशल फ्रंटची मागणी औरंगाबाद : ओबीसीचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी ...

नॉनपोलिटिकल ओबीसी, एससी, एसटी सोशल फ्रंटची मागणी

औरंगाबाद : ओबीसीचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. आता तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. ओबीसीच्या एकूणच प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी बुधवारी येथे माजी आमदारद्वय डॉ. नारायण मुंडे व भाऊ थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली.

नॉनपोलिटिकल ओबीसी, एससी, एसटी सोशल फ्रंटच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत, ओबीसीचे प्रश्न जातनिहाय जनगणनेभोवती फिरत आहेत आणि म्हणून ही अशी जनगणना सरकारने त्वरित केली पाहिजे, यावर भर देण्यात आला.

ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत बहाल केल्याशिवाय औरंगाबाद महापालिकेसह कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत. यासाठी प्रसंगी फ्रंटच्या वतीने न्यायालयातही दाद मागण्यात येईल, असे फ्रंटचे संयोजक महेश निनाळे यांनी जाहीर केले. घटनेची पायमल्ली करून ओबीसीवर जो जो अन्याय -अत्याचार करेल, त्याच्याविरुद्ध आमची ही लढाई असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

पत्रपरिषदेद्वारे करण्यात आलेल्या मागण्या अशा : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाचे गठन केले आहे. त्या आयोगाला तात्काळ तात्काळ आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, राज्यातील ओबीसीचा इम्पिरिकल डाटा तात्काळ सादर करून मागासवर्ग आयोगाकडून अहवाल मागविण्यात यावा, शासकीय व निमशासकीय सेवेतील कर्मचारी-अधिकारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण लागू करण्यात यावे.

प्रत्येक जिल्ह्यात ओबीसीचे जनजागरण करण्यासाठी मेळावे आयोजित करण्यात येतील व वेळोवेळी आंदोलने करण्यात येतील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

प्राचार्य ग. ह. राठोड, माजी महापौर बापू घडमोडे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते मनोहर टाकसाळ, माजी नगरसेविका कीर्ती शिंदे, सरस्वती हरकळ, ॲड. महादेव आंधळे, मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, दिलीप थोरात, प्रा. राम बुधवंत, जगदीश चव्हाण, बबनराव पवार, कचरू वेळंजकर, किशोर शेलार, विष्णू वखरे, डॉ. संदीप घुगरे आदींची पत्रपरिषदेस उपस्थिती होती.