शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग नियंत्रण पथक पद्मावतीत दाखल

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातल्याने भाऊ-बहिणीचा बळी गेला, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’च्या १ सप्टेंबरच्या अंकातून प्रसिद्ध होताच

जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातल्याने भाऊ-बहिणीचा बळी गेला, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’च्या १ सप्टेंबरच्या अंकातून प्रसिद्ध होताच जिल्हा साथरोग नियंत्रण तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी हे दोन्ही पथक गावात दाखल झाले. घरोघर रुग्णांची तसेच पाण्याची तपासणी या पथकाने केली. गावात सध्या तापाचे चारच रुग्ण असल्याचा दावा या पथकाने केला आहे. डेंग्यूसदृश्य तापाच्या आजाराने निवृत्ती उर्फ राजेंद्र भालचंद्र गावंडे (वय ५) व त्याची बहिण अश्विनी भालचंद्र गावंडे (वय ७ वर्षे) यांचा मृत्यू झाला. दोन मुलांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तापाने रुग्ण फणफणत आहेत. काही रुग्णांवर बुलढाणा तर काहींवर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पद्मावती हे गाव तलावाच्या काठावर असल्याने व सध्या पावसाळ्यामुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे २० आॅगस्टपासून गावात तापाची साथ सुरू झाली. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर सोमवारी जिल्हा साथरोग नियंत्रण पथक व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक दुपारनंतर पद्मावती गावात दाखल झाले. घरोघर रुग्णांची तसेच पाण्यात डासअळींची तपासणी करण्यात आली. गावात १८ आॅगस्ट रोजी पाण्यात डासअळी आढळली होती. गावात साथरोग परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पथकामध्ये सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी.एम. कुडलीकर, डॉ. अमोल गंधर, डॉ. एस.के. लांडगे यांचा समावेश आहे.आरोग्य विभागाचा दावाया पथकातील डॉ. एस.के. लांडगे म्हणाले की, यापूर्वी २८ आॅगस्ट रोजीही पाण्यात डासअळींची तपासणी करण्यात आली. यात १६० घरांपैकी ६ घरांमध्ये डासअळी आढळली. त्यामुळे तेथील पाण्यात डासअळी नाशक औषधी टाकण्यात आली. ग्रामपंचायतच्या मदतीने गावात धूरफवारणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गावात नाल्या तुंबलेल्या असल्याने दुर्गंधी पसरली आहे. तेथील एका हापश्यामध्ये घाण पाणी आल्याने त्याचेही शुद्धीकरण करून घेतले. याबाबत संबंधित ग्रामपंचायतला लेखी सूचना करण्यात आल्याचेही डॉ. लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नळणी : येथून जवळच असलेल्या कोदोली गावातही तापाच्या आजाराने थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत येथील आरोग्य सेवक एक महिन्यापासून गायब असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.४गावातील नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे तसेच पाण्याचे डबके तयार झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी साथरोगाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गावात होणारा पाणीपुरवठाही दूषित आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश्य ताप असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गॅस्ट्रो, अतिसार या आजारांच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. ४या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याचे दुर्लक्ष होत असून संबंधितांनी तात्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी प्रकाश गिरणारे, माधवराव गिरणारे, संजय गिरणारे, देवेंद्र गिरणारे, कृष्णा गिरणारे, उत्तम गिरणारे, ज्ञानेश्वर गिरणारे, गणपत गिरणारे, प्रमोद गिरणारे आदींनी केली आहे.जळगाव सपकाळ : डेंग्यूसदृश्य तापाने जळगाव सपकाळ येथील अमोल कैलास सपकाळ (वय १८) या तरूणाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.४गेल्या आठ-दहा दिवसांपासून तापाने थैमान घातले आहे. अमोल सपकाळ या तरूणाच्या मृत्यूने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अमोल हा शिक्षणासाठी औरंगाबाद येथे राहत होता. मात्र पोळा सणामुळे तो गावी आला. त्याचवेळी तो तापाने फणफणला. ४रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. जयश्री बाबूराव सपकाळ (वय ८ वर्षे), यज्ञेश बाबूराव सपकाळ (वय ५ वर्षे) या भावंडांना उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे गावात साथ आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाने तापाच्या साथीची गांभिर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.