हिंगोली : शहरात राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या लाभार्थ्यांना आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते शुक्रवारी आरोग्यपत्रांचे वाटप करण्यात आले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारच्या काळात केंद्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना मंजूर केली. त्याचा लाभ महाराष्ट्रातील अनेक गोरगरिबांना होत आहे. हिंगोली येथे ३५ लाभार्थ्यांना या योजनेचे आरोग्यपत्र वाटप करण्यात आले. यावेळी आ. गोरेगावकर यांच्यासह प्रकाश थोरात, आबेदअली जहागीरदार, ज्ञानेश्वर गोटरे, मोहसीनखाँ पठाण, सुहास हलगे, अॅड. राजेश गोटे, अॅड. घुगे, दुलेखॉ पठाण, शमीखाँ पठाण, निरज देशमुख, इसाखाँ पठाण, ओमप्रकाश खंडेलवाल, अरुण पाटील, सिराजखाँ पठाण, जमीरखाँ पठाण आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष आबेदअली जहागीरदार यांनी हा कार्यक्रम घेतला. यात हाजी सत्तारखाँ, हाजी समदखाँ, हाजी समिउल्लाखाँ, आहादखाँ, महमंद तब्बी, जमीर पठाण, शेख चाँद, महंमद ईसा, वहेदुल्लाखाँ यांना प्रत्येकी दीड ते अडीच लाखापर्यंतच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळाला आहे. (प्रतिनिधी)
‘जीवनदायी’च्या आरोग्यपत्रांचे वाटप
By admin | Updated: August 30, 2014 00:03 IST